Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदहिवड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल; पिंपळे विजयी

दहिवड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल; पिंपळे विजयी

दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad

देवळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या दहिवड ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक पाचमधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कौल देत सत्ताधारी पॅनलच्या यशोदा पिंपळे यांना विजयी केले…

- Advertisement -

दहिवड येथील वार्ड क्रमांक पाचच्या एका जागेसाठी दोन उमेदवार समोरासमोर रिंगणात होते. त्यामध्ये यशोदाबाई सुभाष पिंपळे यांना ३०२ मते मिळून त्या विजयी झाल्या. तर वंदना वामन ठाकरे यांना १९० मते मिळाल्याने त्यांना पराभवाचा धक्का बसला.

दहिवड येथील सत्ताधारी गटाच्या बाजूने निकाल लागल्याने कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. वार्ड क्रमांक पाचच्या मतदारांचा हा विजय आहे असे उपसरपंच राजाराम ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी पॅनलचे नेतृत्व करणारे विलास देवरे, नारायण देवरे, पुंजाराम देवरे, प्रेमनाथ देवरे, दादाजी देवरे, योगेश देवरे, दगडू पवार, उपसरपंच राजाराम ठाकरे, शरद अहिरे, समाधान अहिरे, बाब्या देवरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या