Thursday, May 2, 2024
HomeनाशिकVideo : नाशिक म्हणजे आमचा आत्मा, नाशिकला ड्रग्जमुक्त करणारच; ठाकरे गटाचा ...

Video : नाशिक म्हणजे आमचा आत्मा, नाशिकला ड्रग्जमुक्त करणारच; ठाकरे गटाचा विराट मोर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकला ड्रग्ज माफियांया विळख्यापासून वाचविण्यासाठी व वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था या विषयी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने आज (दि.२०) सकाळी ११ वाजता शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे…

- Advertisement -

शालीमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून मोर्चाची सुरुवात झाली. पुढे इंदिरागांधी पुतळा, हनुमान मंदिर, नेपाळी कार्नर, शिवाजी रोड, गाडगे महाराज पुतळा, वंदेमातरम चौक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, मेहर सिग्नलहून जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकताच मोर्चा धडकला आहे.

या मोर्चात शिवसेना उपनेते बबनराव घोलप, सुनिल बागुल, अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, गणेश धात्रक, कृणाल दराडे, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वंसत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी म.न.पा. गटनेते विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक डी.जी.सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे , युवासेना जिल्हाधिकारी बाळकृष्ण शिरसाठ, विक्रम रंधवे, नदिम सैय्यद, सचिन बांडे, नितीन चिडे, राहूल दराडे, देवा जाधव, बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सुर्यवंशी यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली. कार्यकर्त्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

यावेळी कार्यकर्त्याना संबोधित करताना संजय राऊत म्हणाले की, नाशिक शहर म्हणजे आमचा आत्मा आहे, नाशिकला ड्रग्जमुक्त करणारच, असे वक्तव्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या