नाशिक l Nashik (प्रतिनिधी)
नाशिक शहरातील व परिसरातील सिग्नल यंत्रणा मोठ्या प्रमाणत कोलमडल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य सीबीएस, त्र्यंबक नाका सिग्नल वगळता एबीबी सर्कल, जलतरण तलाव समोरील सिग्नल बंद स्थितीत आहे.
- Advertisement -
यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्ते ओलांडावे लागत आहे. हा प्रकार गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. वारंवार तक्रार करून देखील प्रशासनातर्फे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास जबबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.