Thursday, April 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी; तर...

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी; तर शिंदे सेनेकडून बच्चू कडू अर्ज भरणार

मुंबई | Mumbai

विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (दि.३० एप्रिल) रोजी शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) दोन दिवसांपूर्वीच पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. तसेच एक पोटनिवडणुकीच्या जागेसाठीही उमेदवार घोषित केला होता. तर महायुतीमधील शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झालेला नव्हता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असून, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) नेत्यांच्या कोअर कमिटीची काल (बुधवारी) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यात विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत चर्चा झाल्याचे समजते. यामध्ये माजी आमदार झिशान सिद्दिकी यांचे नाव आघाडीवर होते. अखेर आज (गुरुवारी) सकाळी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

दुसरीकडे शिंदे सेनेकडून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उपसभापति नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित झाले आहे. तर दुसऱ्या जागेसाठी ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल (बुधवारी) रात्री भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलतांना “मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. काल परवा ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व शिवसेनेने मान्य केल्या आहेत. बच्चू कडूचे काम प्रामाणिकपणे राहिल, असे त्यांनी म्हटले.

भाजपकडूनही उमेदवार जाहीर

विधानपरिषद निवडणुकीसाठी काल (मंगळवारी) भाजपने सुनिल कर्जतकर, डॉ. माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी दिली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून (Congress) भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे.

ठाकरे सेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे सेनेने (Shivsena UBT) उद्धव ठाकरे यांच्याऐवजी माजी आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) हे विधानपरिषदेसाठी उमेदवार असणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या आधीही दानवे यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेले आहे. त्यामुळे आता मविआतील घटक पक्ष असणारे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी (Congress and NCP SP) अंबादास दानवे यांच्या नावाला सहमती दर्शवितात का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

कोणाच्या वाट्याला किती जागा येणार?

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ६, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. 

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम-

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे – २३ एप्रिल २०२६
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल २०२६
उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ४ मे २०२६
मतदानाची तारीख – १२ मे २०२६
मतदानाची वेळ – सकाळी ९ वाजेपासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी – १२ मे २०२६ संध्याकाळी ५ वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख – १३ मे २०२६

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सिंहस्थ कंत्राटात बोगसगिरी! विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल...

0
नाशिक | Nashik सिंहस्थमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) नियोजनाची धावपळ सुरू असतानाच, काही संशयितांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालयालाच लक्ष्य केले आहे. मेळ्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि सीसीटीव्ही...