Friday, November 22, 2024
HomeराजकीयVidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या 'इतक्या' जागा लढविण्यासाठी...

Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविण्यासाठी आग्रही

काँग्रेसच्या तिघांसह ६ आमदार राष्ट्रवादीसोबत, अजितदादांचा दावा

मुंबई | Mumbai

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वारे वाहत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. यंदा राज्यात आगामी विधानसभा निवडणूक हि महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात होणार आहे. मात्र, युती आणि आघाडीत अजूनही जागावाटप निश्चित झाले नाही. परंतु,महायुतीमधील अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीत ६० पेक्षा अधिक जागा लढविण्यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! नाशिक-डहाणू नवीन मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचा काल मुंबईत (Mumbai) युवकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या ५४ आमदारांसोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा उल्लेख केला आहे. यावेळी अजित पवारांनी काँग्रेसचे हिरामण खोसकर, झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावाही अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : “अजित पवारांशी युती म्हणजे असंगाशी संग”; भाजप नेत्याच्या विधानामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या?

दरम्यान, अजित पवार हे स्वतःच्या पक्षाचे ५४ आमदारांसोबतच (MLA) काँग्रेसचे (Congress) तीन शेकाप एक आणि दोन अपक्ष या ६० जणांच्या व्यतिरिक्त आणखी जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच महायुतीत आपल्याला ज्या जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करा इतर जागांवर थोडं काम कमी केलं तरी हरकत नाही असेही अजित पवारांनी कालच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले आहे. दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात आली आहे. मात्र, भाजपने १५० पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या