Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन; नेमकं कारण...

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन; नेमकं कारण काय?

मुंबई | Mumbai

एकीकडे राज्यात मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) दोन्ही समाजातील नेत्यांची उपोषण, आंदोलन सुरु आहेत. तर दुसरीकडे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यास आदिवासी समाजाने (Tribal Community) विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही समाज आमनेसामने आले आहे. अशातच आता धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यास अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी विरोध दर्शवत उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : ‘माझी वसुंधरा’ अभियानात नाशिक जिल्ह्याला तब्बल १५ बक्षिसे जाहीर; ७.५ कोटींच्या बक्षिसांची लयलूट

नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला (Dhangar Community) अनुसूचित जमातीच्या (Scheduled Tribe) प्रवर्गातून आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. तसेच सोमवारपासून मंत्रालयासमोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ बसून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. यासोबतच सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर (GR) काढण्याची भूमिका मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याच मागणीकरिता नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार (MLA) गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Dindori News : कादवाला ६.३२ कोटींचा नफा – शेटे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत आदिवासी समाजाच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारने जर धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मी आमदारकीचा राजीनामा देईल, असे म्हटले होते. तसेच राज्य सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे आमची मुले रस्त्यावर येतील. आमचा धनगर आरक्षणाला विरोध नाही. मात्र, आमच्यामध्ये त्यांना जर आणणार असाल तर आम्ही याला विरोध करणार आहोत,असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आता राज्य सरकार नेमके धनगर आरक्षणाबाबत काय निर्णय घेते, हे बघणे महत्वाचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या