Monday, May 6, 2024
Homeनगरसंकटकाळात विखे कुटूंबियाने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली

संकटकाळात विखे कुटूंबियाने नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गामुळे विळद घाट येथे दिवंगत श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या 200 बेडच्या कोविड हॉस्पिटल एकाचा दिवसात फुल होण्याची शक्यता आहे. विखे पाटील कुटुंबाने जिल्ह्यात संकटाच्या काळात देखील नेहमी सहकार्याची भूमिका घेतली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी केले.

- Advertisement -

डॉ.विठ्ठलराव विखे फाऊंडेशनचे सिंधुताई विखे पाटील कोविड हॉस्पिटलच्या लोकापर्ण कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री कर्डिले बोलत होते. यावेळी आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, आयएमचे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. आठरे आदी उपस्थित होते.

यावेळी आ.विखे पाटील म्हणाले, प्रवरा येथे 100 बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले होते. आता ते 200 करण्याचा मानस आहे. त्याचधर्तीवर मातोश्री स्वर्गीय सिंधुताई विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विखे पाटील हॉस्पिटल येथे 200 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. करोनाच्या संकटाची व्यप्ती ही मोठी आहे.

सध्या ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहे. सध्या अनेक जण जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. आता सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जनतेमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना खा.विखे म्हणाले, नगर जिल्ह्यात ऑक्सिजन असलेल्या बेडची संख्या कमी आहे. सर्दी खोकला असला तरी अनेक ठिकाणी नागरिकांना दाखल करून घेतले जात नाही. ही सर्व परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून विखे पाटील हॉस्पिटल येथे 200 बेडचे अद्यावत कोविड सेंटर सुरू केले आहे.

सध्या वैद्यकीय क्षेत्रावर बिलासंदर्भात आरोप होत आहे, हे सर्व आरोप चुकीचे आहे, अनेक जण जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. डॉक्टर पासून ते हॉस्पिटलमध्ये काम करणारे नर्स, मावशी, सफाईवाला, मावशी, वाचमचपर्यंत माणसे देखील सध्याच्या परिस्थितीत भेटत नसलेल्याचे दिसते. त्यातच कोविड रुग्णाच्या उपचारासाठी औषधे व सुरक्षिततेसाठी वापरले जाणारे साहित्य यांच्या किंमती देखील जास्त आहेत. यावेळी स्व. माजी मंत्री अनिल राठोड यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. आ.विखे यांनी राठोड यांच्या आठवणी उजाळा दिला.

दुधाच्या दराबाबत आम्ही लोणी येथे आंदोलन केले होते. त्यावेळी माझा शेजारी असलेली व्यक्ती दुसर्‍या दिवशी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे मला समजले. त्यानंतर मी तातडीने नगर येथे स्त्राव देऊन कोविडची तपासणी केली. सुदैवाने ती चाचणी निगेटिव्ह आली. अन्यथा आमचा देखील कार्यक्रम झाला असता असेही आ.विखे यांनी सांगत सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या