Friday, May 3, 2024
Homeनगरकरोनाच्या दुसर्‍या लाटेतही विखे पाटलांचा प्रवरा पॅटर्न सक्रिय!

करोनाच्या दुसर्‍या लाटेतही विखे पाटलांचा प्रवरा पॅटर्न सक्रिय!

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

करोना संक्रमणाने जवळपास दीड वर्षाचा कालावधी लोटला.पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेची तीव्रता अधिक आहे. बाधितांचा वयोगट आणि मृत्यू दर देखील रोज वाढतोय.नगर जिल्ह्यात देखील दुसर्‍या लाटेत करोनाचा प्रकोप झाला. पहिल्या लाटेत राज्याला आदर्श देणारा राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रवरा पॅटर्न कोविडच्या दुसर्‍या लाटेतही सक्रीयपणे लोकांसाठी काम करताना दिसतोय.

- Advertisement -

पहिल्या संकटात जिल्ह्यातील पहिले कोविड रुग्णालय, तपासणी प्रयोगशाळा निर्मिती, शासकीय रुग्णालयातील महिलांची मोफत प्रसूती, जिल्हाभरात गरीब व गरजू कुटुंबांना रेशन व धान्य वाटप, सिंधू अन्नछत्र, शासकीय यंत्रणेला वैद्यकीय उपकरणे व सुरक्षा किट उपलब्ध करून देणे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ई लर्निंग सुविधा, गावपातळीवरील लोकप्रतिनिधींशी सतत संपर्क, घर ते घर सर्वेक्षण, साखर कारखान्याच्या माध्यमातून मोफत सॅनिटायझरचे वाटप, विळद, अहमदनगर व लोणी येथे स्वतंत्र कोविड रुग्णालये आदी गोष्टींमुळे जिल्ह्यातील आकडेवारीला ब्रेक लागला होता. दुसर्‍या लाटेतही विखे पाटलांचा प्रवरा पॅटर्न आदर्श ठरताना दिसतो आहे.

विळद अहमदनगर या ठिकाणी असलेल्या कोविड रुग्णालयात खाटांची संख्या वाढवली, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लोणी येथे अधिकचे स्वतंत्र 500 खाटांचे कोविड सेंटर सुरू केले.

जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून जवळपास एकूण 1 हजारांहून अधिक खाटांचे कोविड रूग्णालय सुरू असून तेथे रुग्णांना योग्य उपचारा बरोबरच, योगासने, पौष्टीक व सकस आहार दिला जातोय.

विविध शासकीय विभागांशी प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सतत बैठका घेत त्यांचे अभिनंदन करत मनोबल वाढवत कोरोना उपाययोजना व भविष्यातील संकट याबाबत विचारविनिमय व सूचना विखे पाटील करत आहेत.

देशातील तज्ञांनी केलेल्या भाकितानुसार तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून लहान मुले व तरुणांसाठी च्या उपाययोजनांसाठी विखे पाटील सक्रिय झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या