Wednesday, July 24, 2024
Homeनगर1217 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी

1217 गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात कमी पाऊस असणार्‍या तालुक्यातील पैसेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली आहे. यात रब्बी हंगामातील 668 आणि खरीप हंगामातील 549 अशा 1 हजार 217 गावातील पैसेवारी ही 50 पैशांच्या आत आहे.

दरम्यान, शासनाने या पूर्वीच जिल्ह्यातील 96 मंडळात दृष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केलेल्या आहेत. यामुळे या ठिकाणी दृष्काळात देण्यात येणार्‍या सवलती देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पैसेवारीत जिल्ह्यात खरीप हंगामात 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणारी 549 गावे आहेत.

खरीपातील कमी पैसेवारी

अकोले 191, संगमनेर 174, कोपरगाव 16, राहाता 24, श्रीरामपूर 0, राहुरी 17, नगर 0, नेवासा 13, पाथर्डी 80, शेवगाव 34, पारनेर 0, श्रीगोंदा 0, कर्जत 0, जामखेड 0 आहेत.

रब्बीतील कमी पैसेवारी

अकोले 0, संगमनेर 0, कोपरगाव 63, राहाता 37, श्रीरामपूर 34, राहुरी 79, नगर 0, नेवासा 114, पाथर्डी 57, शेवगाव 79, पारनेर 0, श्रीगोंदा 0, कर्जत 118, जामखेड 87 अशी 668 गावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या