Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजVinesh Phogat : अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची तब्येत बिघडली

Vinesh Phogat : अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची तब्येत बिघडली

तातडीने रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) महिलांच्या ५० किलो वजनाच्या अंतिम स्पर्धेत विनेश फोगाटचे (Vinesh Phogat) १०० गॅम वजन वाढल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे भारताची पहिल्या सुवर्णपदकाची संधी हुकली. आज विनेश फोगाटचा सुवर्णपदकासाठी सामना होता, पण त्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात आले. अशातच आता स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर काही मिनिटांतच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : Paris Olympics 2024 : भारताला मोठा धक्का; विनेश फोगाट अंतिम सामन्यासाठी अपात्र

मिळालेल्या माहितीनुसार, विनेश फोगाट पाण्याच्या (Water) कमतरतेमुळे आणि डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध पडली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. विनेश फोगाटने ५० किलो वजन गटात पात्र ठरण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले.तसेच तिने आपली नखे कापली, केसं कमी केली, रक्तही दिले. याशिवाय तिने रात्रभर व्यायामही केला. मात्र,तरीही ५० किलोपर्यंत वजन कमी करण्यात तिला अपयश आले.

हे देखील वाचा : Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ५० किलो वजनी गटातून का खेळली?

हे देखील वाचा : Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी काय म्हणाले?

ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट अपात्र ठरण्याचं नेमकं कारण काय?

विनेश फोगाट ५० किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती.मात्र, तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु,तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विनेश फोगाट आता रौप्य आणि कांस्यपदकासाठीही पात्र होणार नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या