Saturday, September 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमुंबई 'मेट्रो-३'च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; विनोद तावडेंनी ट्विट करत दिली माहिती

मुंबई ‘मेट्रो-३’च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला; विनोद तावडेंनी ट्विट करत दिली माहिती

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिका खुली करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी दरम्यानचा मार्ग मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच सुरू होणार असून त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. याबाबत भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव कसा झाला? भुजबळांसोबत नेमकी काय चर्चा झाली? शरद पवारांनी सगळचं सांगितलं

विनोद तावडे यांनी मुंबई मेट्रो-३ ची (Mumbai Metro Line-3) पहिली झलक दाखवणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. येत्या २४ जुलैपासून मुंबई मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची महत्वाची माहिती त्यांनी ट्विटमधून दिली आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबईकरांचे जीवन आणखी सुखदायी बनवण्याची गॅरंटी दिली होती. ती आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे.मुंबईला आपली पहिली वहिली भूमिगत मेट्रो (अॅक्वा लाइन) २४ जुलैपासून मिळणार आहे. जी शहराच्या वेगाला नवी भरारी देणार आहे” असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे देखील वाचा : शरद पवार नाशकातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

दरम्यान, एमएमआरसीने ३३.५ किमी लांबीच्या भूमिगत मेट्रो ३ मार्गिकेचे काम २०१६ पासून हाती घेतले होते.हे काम पाच वर्षांत म्हणजे २०२१ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक बाबी, आरे कारशेड वाद, पुनर्वसन आदी कारणांमुळे एमएमआरसीला हा मुहूर्त साधता आला नव्हता. परिणामी प्रकल्पाच्या पूर्णत्वाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी मुंबईकरांना प्रचंड प्रतिक्षा करावी लागली होती. त्यानंतर अखेर काम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त लागला आहे.

हे देखील वाचा : “बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…”; मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

असे आहे रेल्वे स्टेशन

भूमिगत मेट्रो रेल्वेच्या स्टेशनची लांबी जवळपास ४७५ मीटर आहे.तसेच या स्टेशनसाठी वेगवेगळे टनेल तयार करण्यात आले असून ते बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती सर्व खबरदारी घेऊन हे स्टेशन बनविण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे येथील बोगद्यातून दोन रेल्वे एकाच वेळी जाऊ शकतात. तसेच बीकेसी स्टेशन बनविताना प्रवाशांना जास्त चालावे लागणार नाही, त्यांना रस्ता क्रॉस करण्याची गरज भासणार नाही याची देखील काळजी या मेट्रो ३ मार्गिकेचे काम करतांना घेण्यात आली आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या