Friday, May 3, 2024
Homeक्रीडाइंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी विराट, रोहितला विश्रांती

इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी विराट, रोहितला विश्रांती

मुंबई | Mumbai

हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात भारतीय संघ (Indian team) येत्या २६ जून ते २८ जून २०२२ रोजी आयर्लंडविरुद्ध (Ireland) २ टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका आटोपून भारतीय संघ लंडनला (London) रवाना होणार आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) चा हंगाम भारतात सुरळीत पार पडल्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाचवी आणि एकमेव कसोटी खेळण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहेत…

- Advertisement -

तसेच यंदाच्या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात (Australia) टी २० वर्ल्डकप (T20 World Cup) होणार आहे. त्यामुळे या सर्व सिनियर खेळाडूंना पुन्हा एकदा निळ्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी भारतीय चाहते उत्सुक आहेत. परंतु रोहित शर्मा , विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी २० मालिकेत खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यातील पाचवी कसोटी १ ते ५ जुलै दरम्यान एजबॅस्टन (Edgbaston) येथे खेळवली जाणार आहे. तसेच आयर्लंडविरुद्ध (Ireland) टी २० मालिकेत सहभागी झालेला संघ इंग्लंडविरुद्ध टी २० मालिका खेळेल अशी माहिती आहे. तर ७ जुलैपासून ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे.

तसेच पाचवी कसोटी ५ जुलैला आटोपल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे तिन्ही सिनियर खेळाडू लगेच होणाऱ्या टी २० मालिकेत सहभागी होणार नसल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात टीम इंडियाची घोषणा होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या ३ टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार) ईशान किशन,राहुल त्रिपाठी,सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड , संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार) युझवेन्द्र चहल, रवी बिष्णोई, आर्षदिपसिंग, उमरान मलिक,आवेश खान आणि हर्षल पटेल

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या