Monday, May 6, 2024
HomeUncategorizedगरीब कल्याण अन्न योजना करोनाकाळातील आधार

गरीब कल्याण अन्न योजना करोनाकाळातील आधार

नाशिक | राजेंद्र सूर्यवंशी Nashik

करोनाने करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काळ, करण्यात आलेली संचारबंदी यामुळे गोरगरिब नागरिक अन्नावाचून वंचित राहू नये म्हणून या अटीतटीच्या काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जिल्ह्यातील गरिबांसाठी मोठा आधार ठरली आहे…

- Advertisement -

सुरुवातीला एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी ही योजना सुरू ठेवण्यात आली. नंतर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. नोव्हेंबरमध्ये या योजनेचा कालावधी संपुष्टात येणार होता. परंतु केंद्र सरकारने मार्च 2022 पर्यंत योजनेला मुदतवाढ दिली आहे. या योजनेतंर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा पाच किलो अधिकचे धान्य दिले जाते.

त्यामध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळतात. जिल्ह्यात सुमारे 1 लाख 78 हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक असून त्याअतंर्गत 8 लाख 58 हजार 954 लाभार्थी आहेत. तर 5 लाख 85 हजार 351 प्राधान्य कुटुंब कार्डधारक असून 28 लाख 35 हजार 136 लाभार्थी आहेत. जिल्ह्यातीलअशा एकूण 38 लाख लाभार्थ्यांना अन्न सुरक्षेचा लाभ मिळत आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेत अनेक सेवाभावी संस्था, मंडळे यांनी सामाजिक उपक्रमातून मोफत अन्न वाटपाचा उपक्रम राबविला. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे करोना आणि लॉकडाऊनच्या काळात कोणीही उपाशी राहिला नाही. परंतु करोनाचा कालावधी जसा जसा वाढत गेला तशी या संस्थांचे मदतकार्य हळूहळू कमी होत गेले. अशा काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा गोरगरिबांना आधार मिळाला.

यात गहू तसेच तांदळाचा समावेश आहे. योजनेला केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्याने मार्च 2022 पर्यंत धान्य मिळणार आहे करोना प्रादुर्भावाच्या काळात देशातील गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने एप्रिल 2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील प्राधान्य कुटुब व अंत्योदय कार्डधारकांना गहू व तांदूळ मोफत देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ठराविक दिवसासाठी असलेल्या या योजनेला आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत लाभार्थ्यांना आता मार्च 2022पर्यंत मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. मनमाड येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या (एफसीआय) गोदामातून पुरवठा विभाग धान्य उचल करत आहे. करोना संसर्गाच्या कठीण काळात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत गरिबांना करोना काळापासून रेशन दुकानांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या