Monday, July 8, 2024
HomeनाशिकNashik-Dindori Constituency 2024 : मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांची मतदान केंद्रांमध्ये रांग

Nashik-Dindori Constituency 2024 : मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांची मतदान केंद्रांमध्ये रांग

नाशिक | Nashik

- Advertisement -

देशासह राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Eletion) पाचव्या टप्प्यातील मतदान (Voting) आज सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडले. यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी (Nashik and Dindori) या दोन लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान झाले. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे ५१.१६ टक्के आणि ५७.०६ टक्के इतके मतदान झाले असून अजून सहा वाजेपर्यंतची टक्केवारी बाकी आहे.

हे देखील वाचा : Nashik-Dindori Constituency 2024 : उमेदवारांसह आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

मात्र, जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील बऱ्याच मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी येण्याची शक्यता आहे.
मतदानाची वेळ संपल्यानंतरही नाशिक शहरातील भालेकर विद्यालयात मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानासाठी
मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे या मतदारसंघावर मतदारांची मोठी गर्दी जमल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक लोकसभेसाठी ५१.१६ तर दिंडोरीसाठी ५७.०६ टक्के मतदान

तसेच सिन्नर तालुक्यातील नंदुर शिंगोटे येथील केंद्रावर सायंकाळी ७. १५ पर्यंत मतदान पार पडले. तर त्र्यंबकेश्वरमध्येही सायंकाळी सहा वाजेनंतर काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. याशिवाय दिंडोरी मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर मतदार मतदानासाठी रांगेत असल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची वेळ वाढवल्याची माहिती मिळत आहे.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : दुपारी तीन वाजेपर्यंत नाशिकसाठी ३९.४१ तर दिंडोरी लोकसभेसाठी ४५.९५ टक्के मतदान

- Advertisment -

ताज्या बातम्या