Tuesday, June 16, 2026
Homeजळगावनिवडणुकीच्या वेळी आजी-माजी आमदार काढताहेत एकमेकांची उणीदुणी

निवडणुकीच्या वेळी आजी-माजी आमदार काढताहेत एकमेकांची उणीदुणी

अमळनेर । प्रतिनिधी
अमळनेर विधानसभा निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापले असून आजी माजी आमदार एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. आता कार्यकर्त्यांची माथी भडकावणारे हे दोघे निवडणूक संपल्यावर आपापले हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप डॉ.अनिल शिंदे यांनी केला आहे.

सध्या चौधरी बंधूनी सूतगिरणीत भ्रष्टाचार केल्याचे पुरावे शहरभर लागले आहेत. त्यानंतर मंत्र्यांनी गौण खनिज प्रकरणात मोठा माल गडप केल्याचा दावा चौधरी गटाने केला आहे. आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण तापले असून एकमेकांची उणीदुणी दोन्ही उमेदवार मग्न आहेत. मात्र निवडून आल्यावर काय करणार याचा वचननामा ते जनतेसमोर हेतुपुरस्सर मांडत नाहीत. शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात अनिल पाटील यांनीच कोट्यवधींच्या कामाचे ठेके घेतल्याचे चौधरी यांनी समोर आणले होते. तसेच शहादा साखर कारखान्यातील फसवणुकीप्रकरणी अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अनिल पाटील यांनी त्यावेळी चौधरी यांच्या विरोधात कोणतीही कडक पाऊले उचलली नाहीत. हे या आजी माजी जोडगोळीने विसरू नये असे डॉ.अनिल शिंदे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...