Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशपुतिन यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यानंतर वँगनर प्रमुख येवगेनी प्रिगोझिन बेलारूसला जाण्यास सहमत

पुतिन यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यानंतर वँगनर प्रमुख येवगेनी प्रिगोझिन बेलारूसला जाण्यास सहमत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गेल्या दोन दिवसांपासून रशियामध्ये (Russia) अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तणाव निर्माण झाला होता. खुद्द राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनीच उभ्या केलेल्या वॅग्नर या समांतर सैन्यगटाने पुतिन (Vladimir Putin) यांच्याचविरोधात बंड केले होते. यामुळे रशियात गृहयुद्धाची आणि सत्ताबदलाची स्थिती निर्माण झाली होती.

- Advertisement -

त्यानंतर असे काही घडू नये म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जबरदस्त हालचाली केल्या. मात्र, उफाळून आलेले वॅगनर ग्रुपचे (Wagner Group) बंड मोडून काढण्यात रशियन सकारला यश आले असल्याने रशियातील संभाव्य विध्वंस टळला आहे…

Video : पुन्हा एकदा रेल्वे अपघात! एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक, १२ डब्बे रुळावरून घसरले

वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) आणि रशियाच्या बाजूने वाटाघाटी करणारे बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांड ल्युकाशेंको (Alexander Lukashenko) यांच्यातील चर्चा यशस्वी ठरली आहे. आपले सैन्य मॉस्कोकडे (Moscow) नाही तर आता बेलारूसमधील (Belarus) लष्करी तळांवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्रेमलिनकडून (Kremlin) देखील तशी घोषणा केली गेली.

यावेळी बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, प्रिगोझिन यांच्यासोबत तणाव कमी करण्याच्या करारावर चर्चा सुरू असल्याचे बेलारुसच्या राष्ट्रपती कार्यालयाने याबाबतची माहिती दिली. तसेच ही चर्चा होण्याआधी प्रिगोझिनचा वॅग्नर ग्रुप थेट रशियाची राजधानी मॉस्कोच्या अवघ्या २०० किलोमीटरहून कमी अंतरावर पोहोचला होता. ही चर्चा यशस्वी झाली नसती, तर आत्तापर्यंत वॅग्नर ग्रुप मॉस्कोमध्ये घुसला असता.

Mumbai Rain : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपले; जागोजागी साचले पाणी

यानंतर हा संभाव्य धोका लक्षात घेऊन रशियन सैन्यानेही मॉस्कोमध्ये तयारी केली होती. रशियन सैन्य वॅग्नर ग्रुपचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र, ही चर्चा यशस्वी ठरल्यामुळे प्रिगोझिनने वॅग्नर ग्रुपला मॉस्कोमध्ये घुसण्याच्या आधीच थांबण्याचे आदेश दिले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Mumbai Rain : मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपले; जागोजागी साचले पाणी

- Advertisment -

ताज्या बातम्या