बीड । Beed
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला वाल्मिक कराड याला आता मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. कराडने जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे.
- Advertisement -
संतोष देशमुख यांची हत्या ही राजकीय आणि वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने स्वतःच्या सुटकेसाठी न्यायालयाकडे जामिनाची मागणी केली होती. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे विचारात घेता न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.




