Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रहिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे दोषी, शिक्षेवर उद्या फैसला

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे दोषी, शिक्षेवर उद्या फैसला

वर्धा | Wardha

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट (Wardha HinganGhat Case) येथील जळीतकांडाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. या प्रकरणाच्या खटल्यात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद संपल्यानंतर आज न्यायालयाने (Court)…

- Advertisement -

या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे (Accused Vikesh Nagrale) दोषी असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाचा निकाल आता उद्या न्यायालय देणार आहे. अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी पत्रकारांना दिली. हिंगणघाट येथील जिल्हा व सत्र न्यायालयात (HinganGhat District and Sessions Court) सुनावणी पार पडली.

या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या १९ दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय, २८ फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात ६४ सुनावण्या घेत २९ साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत.

काय आहे घटना?

घटनेतील मृत प्राध्यापिका (Professor) ही हिंगणघाटच्या स्व.आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात (Ashatai Kunawar Women’s College) वनस्पतीशास्त्र (Botany) विषयाची अर्धवेळ प्राध्यापक (Professor) म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी नियमितपणे ३ फेब्रुवारी २०२० ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली. त्यानंतर नंदोरी चौकापासून काही अंतरावर कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे वाट पाहत होता.

मनात राग ठेवून दुचाकीतील पेट्रोल अंगावर टाकून पीडितेला पेटवण्याचा बेत त्याच्या मनात होता. दिसताक्षणीच आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले. घटनेनंतर लगेच प्राथमिक उपचार करत गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत तिला नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत तिने १० फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या