Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : करंजवण, पालखेडमधून पाण्याचा विसर्ग वाढला

Video : करंजवण, पालखेडमधून पाण्याचा विसर्ग वाढला

ओझे l वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यात ( Dindori Taluka ) आज सकाळपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे ( Rain )नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर ( Flood )आला असून शेतातील पिकांन मध्ये मोठ्या प्रमणात पाणी साचले असल्यामुळे शेतकरी वर्गा मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ होत असल्यामुळे आज सांयकाळी करंजवण धरणातून कादवा नदी पात्रात दहा हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून त्यामुळे कादवा नदीवरील ओझे करंजवण तसेच म्हैळुस्के लखमापूर पुल पाण्याखाली गेल्यामुळे येथील गावाचा संपर्क तुटला आहे.

पालखेड धरणातून बारा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कादवा नदी सोडला आहे.पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे तरी नदी काठावरील गावानी काळजी घ्यावी असे अवाहन करंजवण धरण शाखा अभियंता भालके व पालखेड धरण शाखा अभियंता सानप यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या