घोटी | प्रतिनिधी | Ghoti
इगतपुरी तालुक्यासह कसारा व पाश्चिम घाट (Kasara and Western Ghat) माथ्याच्या परिसरासह गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात सुरु असलेल्या संततधारेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) घोटी शहरासह ग्रामीण आणि पश्चिम भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
हे देखील वाचा : Nashik Bribe News : दीड लाखांची लाच मागितल्याप्रकरणी एटीएसचा पोलिस शिपाई ACB च्या जाळ्यात
गेल्या चोवीस तासात पुंन्हा धुव्वाधार अशी ७३ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे पाऊसाने इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) पावसाच्या सरासरीने किमान धरणसाठ्यांमध्ये ही भरीव वाढ झाल्याने यंदा धरणांच्या साठयात विक्रमी अशी वाढ झाली आहे. तालुक्यातील अती पाऊसाच्या भागात सलग चौफेर तुफानी मारा करीत दुसऱ्या टप्यात पाऊसाने सर्वत्र जोरदार मुसंडी मारली असून घाटमाथ्यावरील इगतपुरी, भावली, मानवेढे, काळूस्ते, वैतरणा पट्टयात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेती जलमय स्थिती आजही कायम राहिली आहे.
हे देखील वाचा : गंगापूर धरणात ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक
दरम्यान, तालुक्यात गेल्या चोवीस तासात ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आजपर्यंत तालुक्यात ८९८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. यावरून पावसाने आपल्या पारंपारिक सरासरीकडे वाटचाल सुरु केली आहे. तसेच सरासरीच्या प्रमाणे अजून देखील ६०० मिमी पाऊस यावर्षी कमी आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी १५८१ मिमी पाऊसाची नोंद होती. तर तालुक्यातील भावली धरण (Bhawali Dam) परिसरात सर्वाधिक पाऊस पडला आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Rain Update : ‘या’ ९ जिल्ह्यांना IMD चा सतर्कतेचा इशारा; नाशिक, नगरमध्ये कसा असेल पाऊस?
धरणाच्या पातळीत विक्रमी वाढ
इगतपुरी तालुक्यातील सर्व धरणांनी उन्हाळयात शंभर टक्के तळ गाठला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र मुसळधारेसह संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे धरणामध्ये कमालीची वाढ़ झाली आहे. दारणा व भावली धरणात अनुक्रमे ७७ व ९६ टक्के वाढ झाली असून धरणे भरल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा