Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedआनंद वार्ता : यंदाही जायकवाडी होणार तुडूंब!

आनंद वार्ता : यंदाही जायकवाडी होणार तुडूंब!

औरंगाबाद – aurangabad

जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) उर्ध्व भागातील धरणातून पाण्याचा विसर्ग (Discharge of water) कायम आहे तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या पाच दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नाले ओढ्यामध्ये चांगलेच वाहत झाले आहे. जायकवाडीतील पाणीसाठा ४८.७० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.

- Advertisement -

(Paithan taluka) पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणात सोमवारी सकाळी आठ वाजेच्या नोंदी अहवालानूसार ३५.२१ टक्के जलसाठा होता. दरम्यान, जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने जायकवाडी धरणातील जलसाठ्यात वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली. त्यानुसार पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी टप्प्याटप्प्याने जायकवाडी धरणात दाखल होत आहे.

दरम्यान, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून ८ हजार ८८० क्युसेक, दारणातून ८ हजार ८४६, कडवा प्रकल्पातून २ हजार २९२, पालखेड धरणातून १६ हजार ७१२ तर नांदूर मधमेश्वरमधून ३५ हजार ७१२ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रातही गेल्या काही दिवसापासून चांगला पाऊस होत आहे. नदी नाले ओढे वाहते झाले तर तसेच वरील भागातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने जायकवाडी सूमारे १ लाख क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरु होत आहे. परिणामी, जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून पाणीसाठा ४८.७० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या