Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग; 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

राज्यात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपलं आहे. तसेच शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे.

- Advertisement -

दरम्यान काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचा जोर अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाने काल सायंकाळपासूनचं दमदार हजेरी लावली आहे. तर ठाणे, कल्याण डोंबिवलीत, पालघरा भागातलही पावसाचा जोर अधिक वाढला आहे.

यातच हवामान विभागाने पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा, कोल्हापूरला पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

तसेच येत्या चार ते पाच दिवसात राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत १९ आणि १९ सप्टेंबरला हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या