Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. त्यातच आता पुढील चार दिवस राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Unseasonal Rain ) मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत तर हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. श्रीलंकेपासून विदर्भापर्यत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे.

Election Commission पवारांना देणार मोठा धक्का? NCP बाबत मोठ्या निर्णयाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ऊस तोडणी यंत्र खरेदीला ४० टक्के अनुदान; काय आहेत अटी व शर्ती?

दरम्यान, काही जिल्ह्यांत मेघ गर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यात मुंबईसह कोकण पट्ट्याचा समावेश आहे. नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रस्त्यात बंद पडलेल्या गाडीला खा. विखेंचा ‘दे धक्का’; सोशल मीडियावर होतंय कौतुक

मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अवकाळी पावसामुळं कांदा, मका, गहू, फळबागा आणि भाजीपाल्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. याशिवाय नाशवंत पीकं भूईसपाट झाल्यामुळं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळं आता हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मदतीची मागणी केली जात असतानाच आता राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं चिंता वाढल्या आहेत.

RRR च्या ‘नाटू नाटू’ची गाड्यांनाही पडली भुरळ; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

- Advertisment -

ताज्या बातम्या