Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाचे नियम डावलून विवाह समारंभ; मनपा प्रशासन व पोलिसांकडून कारवाई

करोनाचे नियम डावलून विवाह समारंभ; मनपा प्रशासन व पोलिसांकडून कारवाई

नवीन नाशिक । प्रतिनिधी

पाथर्डी फाटा येथील हॉटेल ज्युपिटर येथे करोनाचे नियम डावलून विवाह समारंभ सुरू असतांनाच मनपा व पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केल्याने व-हाडी मंडळींची चांगलीच धावपळ उडाली.

- Advertisement -

पाथर्डी फाटा येथील हॉटेल ज्युपिटर येथे लग्न समारंभ चालू होता. यात सोशल डिस्टनसिंग चे पालन न करता लग्न समारंभ चालू असल्याचे निदर्शनास आल्याने मनपा व पोलिसांनी संयुक्तीकरित्या ही कारवाई केली . यावेळी वराच्या वडिलां कडून 5000 वधूच्या वडिलांकडून 5000 आणि हॉटेल मालकाला 5000 असा पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

कारवाई टाळण्यासाठी वऱ्हाडी मंडळीची चांगलीच पळापळ सुरू झाली होती. काही वऱ्हाड हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर पळाले तर काहींनी हॉटेलच्या बाहेर असलेल्या एटीएम मध्ये लपल्याचे दिसून आले. मनपा व पोलिस अचानक आल्याने एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे आता शासनाकडून करोना नियम न पाळणाऱ्यांना कारवाई करत चांगलाच दणका दिला जात आहे.

ही मोहीम नवीन नाशिक कार्यालयीन अधीक्षक दशरथ भवर, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्यासह मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने यशस्वीरित्या राबविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या