Sunday, May 19, 2024
Homeधुळेवीकेण्ड लॉकडाऊनला व्यापार्‍यांचा प्रतिसाद

वीकेण्ड लॉकडाऊनला व्यापार्‍यांचा प्रतिसाद

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात विकेण्ड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. धुळेकरांनी बाहेर न जाता घरातच थांबणे पसंत केले.

- Advertisement -

तर व्यापार्‍यांनी त्यांचे व्यवहार बंद ठेवले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सर्वत्र सन्नाटा दिसून आला. बाजारपेठ ओस पडलेली दिसून आली. जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, डीवायएसपी दिनकर पिंगळे, पोनि. आनंद कोकरे, नितीन देशमुख हे फौजफाट्यासह रस्त्यावर उतरले.

पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर

पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, डीवायएसपी दिनकर पिंगळे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी आज रस्त्यावर उतरले. पोलिसांनी रस्त्यावर येणार्‍यांची कसून तपासणी केली. एरवी गजबजणार्‍या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

धुळेकरांनी घरात थांबून बंदला प्रतिसाद दिला. पाचकंदिल चौक, बारापत्थर, महात्मा गांधी पुतळा चौक, अग्रसेन चौक, साक्रीरोड, संतोषी माता चौक, फाशीपुल, दत्तमंदीर चौक, पारोळा रोड आदी गजबजणार्‍या चौकांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

रिकामटेकड्यांवर कारवाई

शहरासह जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विकेण्ड लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे नागरिकांनी घरातच बसावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. तरी देखील काही रिकामटेकडे रस्त्यावर आले.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची चौकशी केली. चौकशीत तथ्य न आढळल्यास काहींना पोलिसांनी प्रसादही दिला. तर काहींना समज देवून घरी पाठविले. पोलीस यंत्रणा कारवाई करीत असली तरी नागरिक रस्त्यावर येतच आहेत. यामुळे पोलीस यंत्रणाही हतबल झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या