ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक (ठाणे, मुंबई) 9869575547
मेष – आळस प्रगतीस अडथळा ठरेेल
या आठवड्यात आपणांस भाग्योदयासाठी पूरक वातावरण बनेल. तुमच्या संकल्पनांना मूर्तरूप देण्यात यशस्वी व्हाल. ठोस निर्णय घेण्याकडे कल राहील. आर्थिक व्यवहारातील देवाणघेवाण विचारपुर्वक व सुरक्षिततेची काळजी घेऊनच करा. व्यवसायातील भांडवली गुंतवणुक अधिक वाढवल्यास आर्थिक लक्ष पूर्ण होऊ शकेल. वडीलोपार्जित प्रतिष्ठा-नांवलौकीक उपयोगाला येईल. आळस प्रगतीस अडथळा ठरू शकेल. शुभ तारखा : 24 ते 30
वृषभ – निरर्थक चर्चेत सहभागी होऊ नका
हा आठवडा द्विधा मनस्थितीचा राहील. वयोवृद्धांसाठी गंडांतर योग संभवतो. महामृत्युंजय अनुष्ठान केल्याने संकटावर मात होऊ शकेल. अकारण किंवा निरर्थक चर्चेत सहभागी होऊ नका. राजकीय सामाजिक क्षेत्रात नवीन झेप घ्याल. नवीन वाहन, घर खरेदी कराल. वैवाहिक निर्णय घेतांना मोठ्यांचा सल्ला आवर्जुन घ्या. भागीदारीत किंवा मैत्रीत काही प्रमाणात दुरावा निर्माण होऊ शकते. नोकरीत पदोन्नती संभवते. बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देऊन आयुष्याचा वेळ दवडू नका. कोर्टविषयक कामात फसवणूक होण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 26 ते 30
मिथुन – भाग्योदयाचा काळ
या आठवड्यात मामा मावशी आजी या मंडळींचे अनमोल सहकार्य लाभेल. आर्थिक संतुलन राखण्यासाठी योग्य रितीने वित्तीय तरतुद कराल. नवीन नातेसंबंध जुळतील. गुडघेदुखीसारखे विकार त्रास देतील. दुरच्या प्रवासाचे योग संभवतात. भाग्योदयाचा काळ आहे. घाऊक व्यापारातून फायदा होईल. या आठवड्यात अनेक आनंददायी गोष्टी घडतील. कोर्ट कचेरीची कामे निकाली निघु शकतील. व्यावहारिक जबाबदारी वाढेल. शुभ तारखा : 24,25,28,29,30
कर्क – सहजतेने सर्वांना सांभाळून घ्याल
आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या कामकाजास न्याय देण्याचा प्रयत्न कराल. त्याच संदर्भात नवनवीन संकल्पना सुचतील. नोकरदारांना नवीन विषयांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. मौजेच्या वस्तु खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्रात चिंता उत्पन्न होईल. संततीविषयक प्रश्न चर्चेचा विषय बनतील. पुर्वजांनी घालून दिलेल्या रितीरिवाजाचा मान केल्यास अनेक प्रश्न सुलभतेने सुटण्यास उपयोग होईल. श्री गुरुचरित्राचा 14 वा अध्याय पठण करावा. सहजतेने सर्वांना सांभाळून घ्याल. शुभ तारखा : 26,27
सिंह – स्नेहवर्धक आठवडा राहील
घरचे वातावरण मंगलमय बनेल. विद्यार्थ्यांना गूढ विद्या किंवा वैज्ञानिक दृष्टीने संशोधनात्मक विषयात रुची वाढेल. ज्योतिष विद्या किंवा अध्यात्मिक विषयात अभ्यास वाढण्यास अनुकूल ग्रहस्थिती आहे. आपण केलेल्या परिश्रमाला योग्य न्याय मिळू शकेल. आपण आपली जबाबदारी पार पडत असताना मनामध्ये अकारण साशंकता निर्माण होऊ शकेल. मात्र चिंता करण्याचे मुळीच कारण नाही. शिक्षणाला नवी दिशा मिळेल आणि यशही संपादन करु शकाल. स्नेहवर्धक आठवडा राहील. शुभ तारखा : 24,25,28,29
कन्या – आर्थिक उलाढालींचा वेग वाढेल
कौटुंबिक जीवनात सुखाची अनुभूती प्राप्त कराल. आईविषयीची आस्था वृद्धिंगत होईल. तीर्थक्षेत्राच्या यात्रा घडतील. आर्थिक उलाढालींचा वेग वाढेल. सावकारी कर्जाचा बोजा वाढणार नाही याची काळजी घ्या. रखडून पडलेले महत्वाचे निर्णय मार्गी लागतील. पोटाच्या विकाराने त्रस्तता जाणवेल. पित्तप्रकृती असणार्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. मनात अनेकक विचारांचे काहुर माजेल. वाहन चालवताना खबरदारी घ्या. कामापुरतेच संभाषण करा. शुभ तारखा : 26,27
तूळ – अचानक धनलाभ
आपण व्यक्त केलेल्या विचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आठवड्याची सुरुवातच तेजीत होत आहे. नोकरदारांना हा आठवडा मानसिक दृष्टीने संतुलित ठेवणारा आहे. गुंतवणुक करण्यासाठी हा आठवडा अत्यंत शुभ आहे. अचानक धनलाभही होऊ शकेल. स्पर्धा परीक्षेत सन्मान प्राप्त करू शकाल. धार्मिक अथवा नयनरम्य ठिकाणची सहल कराल. भागीदारीतील व्यवहारात मतभेद निर्माण होऊ शकतील. अशावेळी संयमाने रहाणे हिताचे ठरेल. कौटुबिक पातळीवर शांतता राखली जाईल यासाठी प्रयत्नशील रहा.शुभ तारखा: 24, 25,28,29
वृश्चिक – नवीन जागी नियुक्तीची शक्यता
पारिवारिक संबंध दृढ करणारा सप्ताह आहे. आपल्या कल्पनेपेक्षा अधिक आनंद प्राप्त होईल. दुसर्यावर विसंबून राहिल्याने काही प्रमाणात धोका होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे लक्षात ठेवूनच वागावे. पुर्णत्वास जात आलेल्या कामास विलंब करण्यास मनातील भिती कारणीभूत ठरेल. मित्र परिवारासाठी वेळ द्यावा लागेल. नवीन व्यापार उद्योग सुरु करण्यास उचित काळ आहे. परदेशगमनाबाबतचे रखडलेले निर्णय मार्गी लागतील. नवीन जागी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.शुभ तारखा: 24,25, 26, 27.
धनू – इस्टेटीची कामे मार्गी लागतील
पुनर्जन्म लाभल्याचे अनुभूती येईल. मनोबल-धैर्य वाढेल. हा नवचैतन्याचा आठवडा आहे. उगवत्या सुर्याप्रमाणे पुन्हा एकदा कामाला लागा. अनेक प्रकारची कर्तव्ये पार पाडावी लागतील. उद्योग जगतात नवीन झेप घेऊ शकाल. वडीलोपार्जित स्थावर इस्टेटीची कामे मार्गी लागतील. उच्च शिक्षणात काही प्रमाणात चिंता निर्माण होऊ शकतील. संरक्षण क्षेत्रात कार्यरत असाल तर पूर्ण उमेद जागृत ठेवून लढा द्या. व्यावहारिक उलाढाली वाढतील. शुभ तारखा: 24 ते 30
मकर – व्यवहार सहजतेने मार्गी लावाल
आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस विचलित मनस्थितीत जाऊ शकतात. आपलं कौशल्य जनसामान्यास उपयुक्त ठरेल. आपणास उत्तम साथ देणार्या लोकांची भेट होईल. मात्र जास्त भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका अथवा कुणाच्याही शब्दात अडकू नका. तुमच्या कलागुणांना नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक व्यवहार जपुन करा. मशिनरी, जमीन या क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यातील यशाची नांदी ठरू शकेल. व्यवहार सुलभ आणि सहजतेने मार्गी लावाल. शुभ तारखा : 26 ते 30
कुंभ – अनमोल मार्गदर्शनाचा लाभ
या सप्ताहाची सुरुवात मानसिक आनंद प्राप्त करून देणारी राहील. वरिष्ठांकडून अनमोल मार्गदर्शनाचा लाभ होईल. वैचारिक पातळीवर घेतलेल्या निर्णयात अध्यात्माचा खुप मोठा आधार असेल. भावंडांमध्ये काहीप्रमाणात मतभेद निर्माण होऊ शकतात. नांव प्रतिष्ठा या गोष्टींसाठी थोडे सबुरीने घ्या. घरात रामरक्षा आणि हनुमान चालीसा स्तोत्राचे पाठ पठण करावेत. मंगलकार्यात सहभागी व्हाल. मित्रमैत्रिणींबरोबर मौजमजा कराल. शुभ तारखा : 24,25, 28,29,30
मीन – गुंतवणुक कामाला येईल
या आठवड्यात जमिनीच्या व्यापारात फायदा होईल. जुने व्यवहार सुरळीत होण्यास मदतगार ग्रहस्थिती आहे. पुर्वी केलेली गुंतवणुक कामाला येईल. ज्या व्यक्तीशी आपण चर्चा करीत आहात त्या चर्चेतील विषय समजून घ्या मगच प्रत्युत्तर करा . कोणत्याही विषयात फसगत होणार नाही याबाबतीत काळजी घ्या, नवीन गुंतवणुक करण्यासाठी थोडे थांबा. दुरचे प्रवास टाळा. संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. श्रीदत्त आणि गणेशाची उपासना वाढवावी.शुभ तारखा: 24 ते 27