मेष : जोखमीची कामे टाळा
ग्रहांमध्ये कुठलाही मोठा फेर बदल होण्याची शक्यता नाही. म्हणून या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत फार काही बदल दिसणार नाही. कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. देवाण-घेवाण टाळा. विवाहित लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. या आठवड्यात तुमच्यात उत्साह आणि जोष राहणार आहे.
शुभ तारखा : 28, 29, 30
वृषभ : प्रवासाचे योग संभवतात
आठवड्याच्या सुरुवातीस नोकरी करणार्या लोकांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही या आठवड्यात आपल्या उच्च अधिकार्यांसोबत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा कराल. तुम्ही तुमचे विचार त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न कराल. ज्याने त्यांच्या मनात तुमची प्रतिमा एकदम चांगली होईल. य इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन लोकांशी ओळख होण्याची शक्यता आहे. संस्था, संघटनेत महत्त्वाचे काम मिळू शकते. स्थायी मालमत्ता आणि वाहन खरेदीचे प्रबळ योग आहेत. मित्रांपासून, सहकार्यांपासून लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात या थोडे निराशेचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 27, 28, 29
मिथुन : लेखन कार्यात प्रगती
आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला बौद्धिक कार्यांमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपल्या व्यावसायिक जीवनात साम दाम दंड भेदाचे धोरण ठेवून पुढे जाल. . आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगती होईल. तुम्हाला व्यवसायात स्टाफ, पार्टनर आणि कौटुंबातील सदस्यांकडून मदत मिळेल. औद्योगिक क्षेत्राशी निगडित लोकांना या आठवड्यात सकारात्मक संकेत मिळत आहे. शुभ तारखा : 31, 1, 2
कर्क : व्यापार्यात कमी आर्थिक प्राप्ती
आठवड्याच्या सुरुवातीत आरोग्य थोडे नरम गरम राहणार आहे. मानसिकरूपेण थोडे अस्वस्थ राहाल. तसं तर सुख सुविधा देणार्या सर्व वस्तू असतील. तुम्ही आर्थिकदृष्ट्या जास्त सशक्त असाल, पण मनात एक भिती राहील. वाहन किंवा दागिन्यांची खरेदी करू शकता. तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. अपेक्षेनुसार कार्ये होतील. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल मित्रांपासून, सहकार्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शुभ तारखा : 29, 30, 31
सिंह : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
आठवड्याच्या सुरुवातीस काम यशस्वीरीत्या पार पाडाल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमचा रस वाढेल. तुमचे यश बघून तुमचे प्रतिस्पर्धी नाराज होतील आणि रोखण्याचा प्रयत्न देखील करतील. पण त्यांचे एकही षडयंत्र कामी पडणार नाही. या आठवड्यात उत्पादनाच्या प्रचारासाठी खर्च कराल. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. प्रवास किंवा मनोरंजनाच्या साधनांवर पैसे खर्च होतील.
शुभ तारखा : 1, 2
कन्या : आनंदाची बातमी मिळेल
आठवड्याच्या सुरुवातीस अडकलेले कामं पूर्ण झाल्याने कामाला गती येईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन कार्य सुरू करू शकता. घेर, वाहन, दागिने, वस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, गॅझेट्स इत्यादींच्या खरेदीवर विशेष खर्च करण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या प्रेमात पडू शकता. शत्रू पक्षापासून सावध राहा. आनंदाची बातमी मिळेल. सौंदर्यावर धन व्यय होईल. मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल. अडकलेली कामे योग्यवेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. शुभ तारखा : 30, 1
तूळ : खरेदी-विक्रीत लाभाची स्थिती
आर्थिक प्रकरणासाठी हा आठवडा फारच उत्तम राहणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य अनुभवाल. या आठवड्यात कमी मेहनत करूनही त्याचे उत्तम फळ मिळणार आहे. व्यावसायिक प्रकरणातही तुमचे ग्रह साथ देणार आहेत. एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल. गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची स्थिती बनेल. तुमच्या उत्पादनाची बाजारात मागणी वाढल्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळणार आहे. शुभ तारखा: 27, 28, 30
वृश्चिक : वाहन चालवताना सावधगिरी बाळगा
कुणावरही डोळे बंद करून विश्वास करू नका. वाहन किंवा मशीनरी चालवताना सावधगिरी बाळगा. अपघात होण्याची शक्यता आहे. वाहन किंवा मशीनरी चालवताना सावधगिरी बाळगा कारण अपघात होण्याची शक्यता आहे. हनुमान चालीसाचा पाठ करा. शत्रू प्रभावहीन होतील. आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे वादाला कारण ठरू शकते. तुमचे मानसिक संतुलन ठीक असल्याने कोणीही फसवणूक करू शकत नाही.
शुभ तारखा : 29, 1, 2
धनू : पेपरवर्कमध्ये सावधगिरी बाळगा
या आठवड्यात धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. ग्रहांचा साथ मिळणार आहे. कोणाला उधार दिले असतील तर वेळेवर परत मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला बचतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. पेपर वर्कमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील घरात शुभ प्रसंगाचे आयोजन होऊ शकते. शुभ तारखा: 27, 31
मकर : वाहन खरेदीचे प्रबळ योग
या आठवड्याच्या सुरुवातीस जीवनात शुभ प्रसंगांची झडी लागणार आहे. घरात होणार्या शुभ आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहाल. मिळकतीच्या स्रोतांमध्ये वृद्धी होणार आहे. नोकरी करणारे लोक आपल्या मिळकतीत वाढ करण्यासाठी रिकाम्या वेळेचा सदुपयोग करतील. स्थायी मालमत्ता आणि वाहन खरेदीचे प्रबळ योग आहे. शुभ तारखा: 1, 2
कुंभ : कामाची प्रशंसा होईल
आठवड्याच्या सुरुवातीत असे काही प्रसंग येतील ज्याने मान सन्मानात वाढ होईल. सामाजिक जीवन आणि घरात देखील तुमचा मान वाढेल. समाज आणि मित्र मंडळात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि त्यांची पाहण्याची दृष्टी बदलून जाईल. या आठवड्यात तुमची नवीन लोकांशी ओळख होण्याची शक्यता आहे.कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. शुभ तारखा : 29, 30, 31
मीन : मिळकतीपेक्षा खर्च जास्त असतील
भाग्यावर अवलंबून राहू नका, कारण जे काही कमावाल ती फक्त मेहनतीमुळेच मिळणार आहे. म्हणून या आठवड्यात कठिण परिश्रमासाठी तयार राहा. मिळकतीपेक्षा खर्च जास्त राहण्याची शक्यता आहे. म्हणून वायफळ खर्च करणे टाळा. मानसिक व्याकुळतेचे शिकार व्हाल. नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. वाद टाळा. शुभ तारखा : 31, 1