Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यागोवा विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचे मुंबईत जंगी स्वागत

गोवा विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचे मुंबईत जंगी स्वागत

मुंबई | Mumbai

गोव्यात भाजपचा (BJP) विजय झाल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत (Mumbai) जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती…

- Advertisement -

ढोल ताशांच्या गजरात फडणवीस यांचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी भाजपने मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन केले.

गोवा निवडणुकीत (Goa Election) भाजपच्या विजयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून देवेंद्र फडणवीस भाजपचीच सत्ता येणार, असा दावा करत होते. बूथ स्थरावर संघटनात्मक रचना लावण्यापासून निवडणुकीच्या प्रत्येक महत्वाच्या बाबींवर देवेंद्र फडणवीसांचे लक्ष होते. गोव्यात भाजपला दमदार विजय मिळाल्याने मुंबईत भाजपने मोठे सेलिब्रेशन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या