कोलकाता। Kolkata
कोलकातामधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर (Kolkata Rape and Murder) देशभरात संतापाची लाट आहे. यानंतर डॉक्टरांना रुग्णालयात सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान पश्चिम बंगालच्या आरजी का हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी कोलकाता आणि हावडामध्ये डॉक्टरांनी आंदोलन पुकारले असून नवब्बा अभियान मोर्चाचे आयोजन केले आहे.
या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केला असून त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या तसेच पाण्याचा माराही केला आहे.
हे हि वाचा : गोदावरीला पूर, जायकवाडीचा उपयुक्तसाठा 50 टक्क्यांवर
दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याची रविवारी पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. तुरुंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांनी ही चाचणी घेतली असून या चाचणीत संजय रॉय याने सर्व चुकीची उत्तरे दिल्याचे वृत्त एका वृत्त पत्राने दिलं आहे. या चाचणीदरम्यान संजय रॉय अस्वस्थ आणि चिंताग्रस्त दिसत होता. त्याने खोटी आणि न पटणारी उत्तरे दिली आहेत.
हे हि वाचा : गो…गो…गो…गोविंदा! दहीहंडीनिमित्त राज्यभरात उत्साह, महिला गोविंदांनी ‘मटकी’…
दरम्यान, रॉयच्या वकील कविता सरकार यांनी दावा केला की बचाव पक्षाच्या वकिलांनी ही चाचणी केव्हा आणि कुठे केली जाईल, याची माहिती दिली नव्हती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून बचाव पक्षाचा कोणताही वकील उपस्थित राहू शकला नाही, असंही त्या म्हणाल्या.