Monday, July 15, 2024
Homeक्रीडा'कायरन पोलार्ड'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!

‘कायरन पोलार्ड’चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!

वेस्ट इंडिजचा (WEST INDIES) अष्टपैलू आणि आयपीएलमधील (IPL) मुंबई इंडियन्सचा (MI) स्टार खेळाडू कायरन पोलार्ड (KIERON POLLARD) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (INTERNATIONAL CRICKET) अलविदा केला आहे. पोलार्डने सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली.

- Advertisement -

पोलर्डने म्हटलं आहे की, ‘मी दहा वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्ट इंडिज संघात खेळण्याचे माझे स्वप्न होते. गेल्या पंधरा वर्षांपासून टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांत मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करत आहे. पण, आता विचार करुन मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ पोलार्डने केलेल्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

पोलार्डचा जन्म १२ मे १९८७ झाला. पोलार्ड ज्या गावात वाढला ते शहर गुन्हेगारी विश्वाचं मुख्य केंद्र होतं. घरात मोठी गरिबी, वडिल लहापणीच सोडून गेले. आईनं दोन बहिणींसह त्याला वाढवलं. ही सर्व परिस्थिती त्याला गुन्हेगारी विश्वात जाण्यासाठी प्रवृत्त करणारी होती. पण त्यानं क्रिकेट विश्वात प्रवेश केला.

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मुख्य खेळाडू असलेल्या पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी चक्क आपल्या स्वत:च्या राष्ट्रीय संघाला नकार दिला होता. त्याच झालं असं की २०११ मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपल्या संघातील क्रिकेटपटूंना टी२० लीगमधून मिळणाऱ्या पैशातून आपल्या वाट्याचे पैसे घेण्यासाठी त्यांना एका करारात बांधायचे ठरवले होते. परंतु हट्टी स्वभावाच्या पोलार्डने त्यावेळी थेट आपल्या देशाचा क्रिकेट करार फेटाळला होता.

पोलार्डने १२३ वन डे, १०१ ट्वेंटी-२० सामन्यांत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने वन डेत २७०६ आणि ट्वेंटी-२०त १५६९ धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर एकूण ९७ विकेट्स आहेत.

पोलार्डने १० एप्रिल २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तत्पूर्वी २००८मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री मारली होती. २०२२मध्ये भारताविरुद्ध तो अखेरचा वन डे व ट्वेंटी-२० सामना खेळला होता.

पोलार्डच्या आंतरराष्ट्रीय करिअरचे आकर्षण टी २०आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेच्या अकिला धनंजयच्या एका षटकात मारलेले सहा षटकार राहिले आहे. पोलार्ड २०१२ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्टइंडीज संघाचा हिस्सा होता. पोलार्डला कधीही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या