Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशभारताची राष्‍ट्रभाषा कोणती?कनिमोळींच्या उत्तराने सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट

भारताची राष्‍ट्रभाषा कोणती?कनिमोळींच्या उत्तराने सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळविण्यासाठी भारताने अनेक सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत. पाकिस्तानचा दहशतवादाचा चेहरा जगासमोर टराटरा फाडण्यासाठी भारताने सर्व पक्षीय शिष्टमंडळ जगातील अनेक देशांमध्ये पाठवले आहे. त्यातीलच द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ स्पेनला सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतायत. त्यांच्यात झालेल्या चर्चेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. असे काय आहे या व्हिडीओत? सविस्तर जाणून घेऊया.

स्‍पेनमध्‍ये कनिमोळी करुणानिधी यांना या कार्यक्रमादरम्यान भारताची राष्‍ट्रभाषा कोणती? असा सवाल करण्‍यात आला. यावर त्‍यांनी दिलेले उत्तर सर्वच भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारे ठरले आहे. कनिमोळी यांचे उत्तर हे तामिळनाडूतील द्रमुक सरकार आणि केंद्र सरकारमध्ये भाषेवरून अलिकडेच झालेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देण्‍यात आले आहे.

- Advertisement -

भाषेबद्दल काय बोलल्या कनिमोळी
माद्रिदमधील भारतीय डायस्पोराच्या एका सदस्याने त्यांना भाषेबद्दल हा प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर देताना त्या म्हणाल्या, भारताची राष्ट्रभाषा एकता आणि विविधता आहे. हाच संदेश हे शिष्टमंडळ जगाला देतेय. आणि याच कारणामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेण्ड होतोय. भारताची राष्ट्रभाषा ‘विविधतेत एकता’ आहे. हे उत्तर देऊन त्यांच्या शिष्टमंडळाने जगाला भारतात एकात्मता असल्याचा संदेश जगाला दिला.

YouTube video player

भारताला दहशतवादाचा सामना करावा लागतोय
दहशतवादाबाबत बोलताना कोनिमोळी म्‍हणाल्‍या की, ” भारत आपल्‍या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्‍नशील राहिला आहे. आम्‍ही आमचे विकासाचे ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी कटीबद्‍ध आहोत. मात्र दुर्दैवाने आम्हाला दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. हा संघर्ष भारतावर लादलेला संघर्ष असून तो पूर्णपणे अनावश्यक आहे. भारत हा जगातील एक सुरक्षित देश आहे. केंद्र सरकार काश्‍मीरमध्‍ये सुरक्षा अबाधित राहण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहे. दहशतवादी आम्‍हाला आमच्‍या ध्‍येयापासून विचलित करु शकत नाहीत. काश्मीर सुरक्षित ठिकाण राहील आम्‍ही विविध उपाययोजना राबवत आहोत.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...