Tuesday, March 25, 2025
Homeभविष्यवेधगृहकलह टाळण्यासाठी काय करावे ?

गृहकलह टाळण्यासाठी काय करावे ?

1 लादी पुसून काढावी- तुरटीच्या पाण्यात सैंधव मीठ टाकून घरातील लादी पुसून काढावी किंवा सैंधव मिठाच्या पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि कापूर टाकावे. ह्या पाण्याने सर्व घरात पुसून काढावे. आपण स्वछतागृह आणि स्वयंपाकघरात देखील हे पाणी वापरू शकता. स्वच्छतागृहात मीठ किंवा तुरटीने भरलेली वाटी ठेवावी. दर महिन्यात या वाडग्यातले मीठ किंवा तुरटी बदलावी. अशी आख्यायिका आहे की हवेमधील आर्द्र्तेबरोबरच मीठ आजूबाजूच्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. त्यामुळे सकारात्मकतेची पातळी वाढते.

2 दारं आणि खिडक्या – तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. खिडक्या, दारं, बाल्कनीमध्ये कापूर आणि तुरटीचे बारीक खडे ठेवल्याने वास्तूदोष तर जातोच त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही.

3 उदबत्ती लावावी – हिंदू धर्मात 16 प्रकाराच्या उदबत्त्यांचं महत्त्व आहे. अगर, तगर, शैलज, नागरमोथा, चंदन, नाखनखी, मुशीर, जटामांसी, कापूर, ताली, सदलन, गुग्गुळ आणि कुष्ठरोग याशिवाय इतर मिश्रणही घालावे. ह्यात आंबा, कडुलिंबाची सालं घालून धूप दिले जाते किंवा ह्या सर्व साहित्यांना शेणाच्या गोवर्‍या जाळून त्यावर टाकून संपूर्ण धूर घरात द्यावा असे केल्यास घरात आणि मनात शांती मिळते दुःख आणि शोकांचा नायनाट होतो. गृहकलह, पितृदोष आणि अघटित काहीच घडत नाही. घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, वास्तुदोष दूर होऊन कुंडलीत असलेले ग्रहदोष पण दूर होतात.

4 कापूर लावावा – घरात दररोज सकाळ-संध्याकाळ कापूर लावणे शुभ मानले जाते. कापूर घरातील नकारात्मक ऊर्जेला दूर करून घरात सकारात्मक ऊर्जेचं प्रसरण करतं. शरीरं आणि मन शुद्ध होते. सर्व ताण तणावांपासून मुक्तता होते. शास्त्रानुसार घरात कापूर पेटवल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. कापूर जाळल्यामुळे देवदोष, कालसर्पदोष आणि पितृदोष सारखे दोषांचे शमन होते. घरात सकारात्मक उर्जेसाठी आणि शांती मिळविण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ तुपामध्ये कापूर भिजवून जाळल्याने त्याच्या सुवासामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात शांती राहील. घरातील कुठल्या स्थळी वास्तुदोष असल्यास त्या जागी कापराच्या 2 वड्या ठेवून द्या, त्या संपल्यावर अजून 2 ठेवून द्या असे केल्याने वास्तुदोष नाहीसा होतो.

घरातील कलह टाळण्यासाठी हे करावे..

- Advertisement -

घरात हसणार्‍या कुटुंबाची छायाचित्रे आणून अतिथी कक्षामध्ये लावावी. आपल्याला कोण्या दुसर्‍या कुटुंबाचे छायाचित्र लावायचे नसेल तर आपण स्वतःच्या कुटुंबाचा एखादं छायाचित्र देखील दक्षिण पश्चिम दिशेच्या कोपर्‍यात लावू शकता. ह्यामध्ये आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य पाहिजेत आणि त्यांचे चेहरे आनंदित असायला हवे.जर का पती-पत्नीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असेल आणि आपल्यामध्ये काहीही कारणास्तव प्रेम संबंध निर्माण होत नसल्यास आपल्या झोपेच्या खोलीत राधा-कृष्णाचे एक सुंदर चित्र लावावे.

काही कारणास्तव राधा-कृष्णाचे चित्र लावू शकत नसल्यास हंसाच्या सुंदर जोडीचे चित्र लावावे.याशिवाय हिमालय, शंख किंवा बासरीची चित्रे देखील लावू शकता. लक्षात ठेवा, वरील पैकी कोणतेही एक चित्रच लावायचे आहे.झोपण्याची खोली आग्नेयकोनी असल्यास पूर्व-मध्याच्या भिंतीवर शांत सागराचे चित्र लावू शकता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...