Monday, May 13, 2024
HomeUncategorizedविद्यार्थ्यांना काय शिकवावे!

विद्यार्थ्यांना काय शिकवावे!

औरंगाबाद – aurangabad

मुलांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम यावा, अशी अपेक्षा शिक्षक, पालक (Teachers, parents) व अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. मात्र त्याची खरंच अंमलबजावणी होते आहे का, मुलांना शाळेत शिकवलेले कळते का, त्याचे आकलन योग्य आहे की नाही याची माहिती घेण्याचे शिक्षण विभागाने ठरवले आहे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्याच्या वयानुसार आणि वर्गानुसार त्याला काय यायला हवे याची सर्व माहिती चित्रांसह शाळेच्या किंवा वर्गाच्या दर्शनी भागात लावावी. मार्चपर्यंत कोणत्या वर्गांना काय शिकवणार याचे वेळापत्रक तयार करा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे सीईओ नीलेश गटणे (CEO Nilesh Gatane) यांनी शहरी व ग्रामीण भागातील शाळांना दिले आहेत.

- Advertisement -

कोरोना (corona) काळात मुलांच्या शैक्षणिक आकलनावर, गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला. मुलांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. काही जण वाचन विसरले आहे. काहींना अंक गणितांचाही विसर पडलाचे समोर आले आहे. हे नुकसान भरून काढण्याबरोबरच मुलांमध्ये पुन्हा प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुलांना वयानुसार आणि ते शिकत असलेल्या वर्गानुसार कोणत्या विषयांचे ज्ञान असावे याची माहिती प्रत्येक वर्गात लावण्यात यावी, असे शिक्षकांच्या सहविचार सभेत गटणे यांनी सांगितले.

असे असावे पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण

बालवाडी- १ ते १० अंक ओळख, वस्तू, आकार ओळखणे

पहिली- १ ते ९९ पर्यंतच्या संख्या वाचणे, लिहिणे, बेरीज, वजाबाकी

दुसरी- १ ते ९९९ पर्यंत संख्या वाचन

तिसरी- गुणाकार, उदाहरण सोडवणे

चौथी- वाचन लेखन, संख्या ज्ञान, मूलभूत क्रिया

पाचवी- भागाकार चार अंकी संख्येला दोन अंकाने भागणे

सहावी ते आठवी- संख्या ज्ञान, अपूर्णांक, भूमिती, मापन, बीजगिणत

- Advertisment -

ताज्या बातम्या