Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? राज ठाकरेंनी एका शब्दातच विषय संपवला

पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? राज ठाकरेंनी एका शब्दातच विषय संपवला

मुंबई | Mumbai

शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. यानंतर मनसेने संतप्त महाराष्ट्राची मानवी साखळी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहीमेसाठी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला…

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू आहे. राज्यातील राजकारणी एकमेकांशी भांडतात, नंतर एकत्र येतात. आता राज्यात जे झाले, ते झाले. आता काहीजण तडजोड करत आहेत. त्याची चिंता नाही.

अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड! अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व मत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला

पण उद्याच्या पिढीसाठी यांनी ताटात काय वाढून ठेवले आहे ते महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे राजकारण करत आहात? भावी पिढीला हेच राजकारण वाटले तर महाराष्ट्राचे राजकारण कुठे जाईल. याचा विचार कोणी करत आहे का? कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, सत्ता आणि स्वार्थाचे राजकारण करायचे, हे फार घाणेरडे राजकारण असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

उद्या पावसाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? अशी विचारणा राज ठाकरेंना केली असता ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी ‘घंटा’ असे एका शब्दात उत्तर दिले आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशन मुंबईत १५ दिवस सुरू राहणार असून या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पोहण्याचा मोह आला अंगलट! मार्वे बीचवर ५ शाळकरी मुलं बुडाली

- Advertisment -

ताज्या बातम्या