मुंबई ।
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकाच व्यासपिठावर एकत्र आले असल्याचे बघायला मिळाले. दरम्यान नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणूका आणि एकूणच राजकीय स्थिती बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भाष्य करतात या कडे सर्वांचे लक्ष लागून होते.
राज्यात, कल्याण-डोंबिवलीमध्ये जे काही सुरू आहे त्यामुळे राजकारणाची शिसारी आली. बाळासाहेब आज नाहीत हे त्यामुळे बरंच झालं, नाहीतर आज त्यांना वेदना झाल्या असत्या, त्याच बरोबर यापुढे मराठीच्या मुद्द्यावर कायम लढत राहू असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हण्टले आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. खर तर बाळासाहेबांना शब्दात कस मांडावे त्यांच्यावर कसे बोलावे जर ठरवले तर मी आणि उद्धव ठाकरे तास अन तास तुमच्याशी बोलू शकतो, बाळासाहेब ठाकरे या विषया वरती मला एक व्याख्यान द्यावेसे वाटते असे बाळासाहेब जेव्हा व्यंग चित्र काढायचे तेव्हा त्यांची एकाग्रता ही बघण्यासारखी होती. जगात असा कुणीही व्यंगचित्रकार झाला नाही, देशातील सगळ्या राजकारण्यांपेक्षा बाळासाहेब वेगळे माणूस होते, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.




