Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedव्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला मिळणार विशेष अधिकार; आता आक्षेपार्ह मेसेज आल्यास...

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनला मिळणार विशेष अधिकार; आता आक्षेपार्ह मेसेज आल्यास…

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या युझर्ससाठी नेहमीच नवनवीन फिचर्स (New Feature) घेऊन येते. आता कंपनी लवकरच आणखी एक नवीन फिचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे ग्रुपच्या ॲडमिनला (Group admin) काही विशेष अधिकार मिळणार आहे…

- Advertisement -

आता व्हॉट्सअ‍ॅपवरच करता येणार फोटो, व्हिडीओ एडीट; ‘अशी’ आहेत वैशिष्ट्ये

या फिचरच्या माध्यमातून ग्रुपच्या ॲडमिनला ग्रुपवरील मेसेज सर्वांसाठीच डिलीट (Delete) करता येणे शक्य होणार आहे. यामुळे ग्रुपच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेले मेसेज तसेच अनावश्यक मेसेज ग्रुपच्या सदस्यांनी पाहण्याआधीच डिलीट करण्याचा अधिकार ॲडमिनला मिळेल.

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा लसीचे प्रमाणपत्र; ‘असे’ करा डाउनलोड

व्हॉट्सॲप ग्रुपमधील (WhatsApp Group) मेसेज डिलीट करण्याची सुविधा लवकरच अँड्रॉइड (Android) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. जर तुम्ही ग्रुप ॲडमिन असाल, तर व्हॉट्सॲप बीटाच्या (WhatsApp beta) येणाऱ्या अपडेटमध्ये तुम्हाला ग्रुपमधील मेसेज सर्वांसाठी डिलीट करता येणे शक्य होईल, अशी माहिती मिळत आहे.

This was deleted by an admin असा मेसेज ॲडमिनने मेसेज डिलीट केल्यावर चॅटमध्ये दिसेल. कोणत्या ॲडमिनने मेसेज डिलीट केला आहे हे माहितीही सदस्यांना समजणार आहे. या फीचरमुळे अश्लील किंवा आक्षेपार्ह संदेश हटवणे ग्रुप अॅडमिनला शक्य होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या