Thursday, May 2, 2024
Homeजळगावगुटखा तस्करी करणारे वाहन आमदार पकडतात तेव्हा....

गुटखा तस्करी करणारे वाहन आमदार पकडतात तेव्हा….

मुक्ताईनगर Muktainagar

मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) महाराष्ट्राकडे गुटख्याची (Gutkha smuggling) तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असून यापूर्वी तीन ते चार वेळेस मोठ्या कारवाया झाल्यानंतर देखील नियमित गुटख्याची तस्करी महाराष्ट्रात केली जात असताना आज आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातच सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गुटख्याची गाडी (catching Gutkha’s smuggling vehicle) पकडून गाडीसह लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांच्या स्वाधीन केला या संदर्भात पोलिसांच्या भूमिकेवर (role of the police) मात्र प्रश्नचिन्ह (question mark) निर्माण होत आहेत.

- Advertisement -

  दरम्यान आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर शहराकडे येणारी गाडी क्रमांक एम एच 19 सी वाय 92 87 या गाडीत गुटखा असल्याची माहिती मिळाल्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रवर्तन चौकात जाऊन या गाडीला पकडले. आणि तेथे गाडीमध्ये गुटखा असल्याची माहिती घेतली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करून गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली.

पोलीस स्थानकाच्या आवारात गाडीतील गुटख्याचे पोते  उतरवण्यात आले. मोठ्या प्रमाणात यात गुटखा आढळून आला असून त्याची किंमत गाडीसह अंदाजे वीस लाखापर्यंत असल्याचे समजते. प्रत्यक्ष  अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणी अंतिम त्याची किंमत ठरणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली.

दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून मुक्ताईनगर शहरातून मध्य प्रदेशाकडून येणारा गुटक्याची तस्करी केली जात असताना पोलिसांची भूमिका मात्र बघायची असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा केली जात आहे. पुन्हा पुन्हा मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर तालुक्यात गुटक्याच्या अवैध तस्करी करणाऱ्या गाड्या बिनदिकतपणे पास होत असल्याने पूर्णाड चेक पोस्ट तसेच पोलिसांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळेच या तस्करीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकां मध्ये चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या