Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस प्रबोधिनीवर जेव्हा हल्ला होतो ...

पोलीस प्रबोधिनीवर जेव्हा हल्ला होतो …

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीवर तीन बंदूकधारी आतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार करत हल्ला केल्याची घटना शनिवारी (दीं. ६) रात्री दहाच्या सुमारास घडली. नाशिक पोलिसांच्या शिघ्रकृती दलाने सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्ना नंतर. शिताफीने तिघांनाही कंठस्नान घातले. असे या अतिरेकी हल्ल्याचे मॉकड्रील नाशिक पोलीस व शीघ्र कृती दलाने शनिवारी रात्री साडेनऊ ते साडेअकरा वाजेदरम्यान केले.

- Advertisement -

यामधे पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले, सर्व सहायक आयुक्त तसेच सरकारवाडा, सातपूर, गंगापूर, मुबई नाका, भद्रकाली, अंबड या पोलीस ठाण्यांच्या अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

घटनेची माहिती मिळताच प्रत्येक पोलीस विभागाचा कसा, किती वेळात प्रतिसाद मिळतो. खास अशा हल्यांसाठी तयार करण्यात आलेले शीघ्र कृती दल परस्थिती कशा प्रकारे हाताळते. याची चाचपणी याद्वारे घेण्यात आली. झालेल्या चुका व कमतरता याबाबत आयुक्तांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या