Wednesday, December 4, 2024
Homeभविष्यवेधटीव्ही-फ्रिज कुठे ठेवताय?

टीव्ही-फ्रिज कुठे ठेवताय?

आयुष्यात येणारं प्रत्येक वळण तुम्हाला काहीतरी शिकवून जात असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक वळण तुमच्या भविष्यालाही आकार देत असतं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तुमच्या आयुष्यात होणारे कोणतेही बदल भविष्यावर परिणाम करत असतात. मग ते घरात एखादी वस्तू आणण्यापासून ती वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं असो किंवा आणखी काही. आता तुम्ही म्हणाल घरातल्या वस्तूंचा आणि भविष्याचा नेमका काय संबंध? तर, संबंध आहे आणि तोसुद्धा तितकाच महत्त्वाचा. घरातील काही घटक तुम्हाला वास्तूशास्त्रातील नियमांच्या धर्तीवर पुढे जाण्यासाठी मदत करत असतात. तुमच्यावर आणि कुटुंबावर लक्ष्मीची कृपा असते. तर, घरातील सकारात्मकतेची सूत्रसुद्धा या वस्तूंवर बर्‍याचदा आधारलेली असतात.

* घरात औषधं कुठे ठेवावीत? – सर्दी- पडसं, अंगदुखी- डोकेदुखी यांसारख्या तक्रारी बर्‍याचदा अनेकांना सतावत असतात. या पार्श्वभूमीवर काही प्राथमिक औषधं कायम आपल्या घरात असतात. सिरप, गोळ्या, तेल आणि बरंच काही. अनेकदा या गोष्टी आपण टेबल, खुर्ची, एखादा कोपरा पकडून तिथं ठेवत असतो. पण, वास्तूच्या नियमांप्रमाणे असं करणं योग्य नाही. चुकूनही स्वयंपाकघराच्या दक्षिणेला औषधं ठेवू नयेत. झोपल्यानंतर डोक्यापाशीही औषधं ठेवू नयेत. असं केल्यास आरोग्यासंबंधीच्या तक्रारी आणखी वाढतील.

- Advertisement -

* आरसा लावण्याच्या योग्य दिशा – अशी फार क्वचितच घरं तुम्हाला आढळतील जिथं आरसा नसेल. असं म्हणतात की आरशामुळं घरातील भरभराट वाढते. सोबतच आपल्याला आपलं प्रतिबिंबही पाहता येतं. पण, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की घराच्या बेडरूममध्ये कधीच आरसा लावू नका. आरसे एकमेकांसमोरही लावू नका. असं केल्यास वास्तूदोष निर्माण होतात. आरसा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा.

* टी.व्ही. आणि फ्रिज कुठे ठेवाल? – घरामध्ये टीव्ही, फ्रिज किंवा इतर कोणतंही विद्युत उपकरण ईशान्य कोपर्‍यात ठेवू नका. या वस्तू आग्नेय कोपर्‍याला ठेवल्यास शुभसूचक ठरतात. फ्रिज ठेवण्यासाठी उत्तर-पश्चिम दिशा अगदी योग्य.

* फर्निचर ठेवण्याची योग्य दिशा कोणती? – विश्वास बसणार नाही, पण घरातील फर्निचरसुद्धा वास्तूदोष दूर करण्यात आणि एखाद्याच्या नशिबाला हातभार लावण्यात मदत करत असतं. घरातील पश्चिम किंवा दक्षिण दिशेला सोफा असणं नेहमी फायद्याचं ठरतं. हलक्या फर्निचरसाठी पूर्व किंवा उत्तर आणि अवजड फर्निचरसाठी पश्चिम किंवा दक्षिण दिशा उत्तम मानली जाते. या दिशांचं पालन केल्यास भाग्योदयाला फार वेळ लागत नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या