Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार - मंत्री भुजबळ

शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार – मंत्री भुजबळ

नाशिक | Nashik

देशासह राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Lok Sabha) मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) आणि नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव (Pimpalgaon) येथे सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली.

- Advertisement -

हे देखील वाचा : नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीन होणार – पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “मोदी साहेबांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास एक दिवस पुरणार नाही. गेल्या ६० वर्षांत जी कामे झाली नाहीत ती मोदींनी १० वर्षांत कणखर निर्णय घेऊन केली आहेत. त्यांनी भारताची प्रतिमा वाढण्यासाठी जे निर्णय घेतले ते देशाच्या हितासाठी घेतले आहेत. मोदींनी जी कामे केली आहेत ती महाराष्ट्रातील सरकारने देखील केली आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गचे काम महत्वाचे आहे. या सर्वांमुळे आर्थिक विकास होत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून १४ कोटी नळ जोडण्या झाल्या आहेत. यात येत्या काही दिवसांत माझ्या मतदारसंघातील जलजीवन मिशनचे देखील काम पूर्ण होणार असून त्याद्वारे लोकांना घराघरांत पाणी मिळणर आहे”, असे भुजबळांनी म्हटले.

हे देखील वाचा : “ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी…”; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “देशात स्वच्छता असली तर तुमच्या-आमच्या मुलाबाळांचे आरोग्य सुधारणार आहे. पंतप्रधान मोदींनी हे काम गेल्या दहा वर्षांत केले आहे. तसेच मोदींनी इतर जातींसह ओबीसींसाठी विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. ओबीसीसाठी १२ लाख घरे बांधण्याचे कामही मोदी सरकारने दहा वर्षांत केले आहे. एकही माणूस झोपडीत राहता कामा नये यासाठी मोदी सरकारकडून हजारो कोटी खर्च केले जात आहेत. नाशिक ही जशी यंत्रभूमी आणि मंत्रभूमी आहे तशी ती कृषीभूमी देखील आहे. या भागातील कांद्यासह अन्य भाजीपाला इतर ठिकाणी पाठवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील या सरकारने काम केले असून अद्यापही करत आहे”, असे भुजबळ यांनी म्हटले.

हे देखील वाचा : मोदींच्या सभेपूर्वी लासलगावला कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांची निर्यातबंदी विरोधात घोषणाबाजी

तसेच सध्या जिल्ह्यातील शेतकरी कांद्याला भाव मिळत नसल्याने आणि वेळोवेळी लावण्यात येणाऱ्या कांदा निर्यातबंदीमुळे अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मी मोदींना येथील शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पत्र देणार आहे. कांद्याला १० लाख खर्च येत असेल तर शेतकऱ्यांना २००० हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कांदा हे गरीब शेतकऱ्याचे मुख्य पीक असून त्याच्या उत्पन्नाचा तो स्रोत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्याला संपूर्ण पैसे मिळालेच पाहिजे. तसेच या कोलमडत चाललेल्या शेतकऱ्याला वाचवायचे असेल तर त्यातून मार्ग फक्त पंतप्रधान मोदीच काढू शकतात, असे छगन भुजबळ म्हणाले.

हे देखील वाचा : महायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला

याशिवाय देशातील ८० कोटी घरांना मोफत अन्नधान्य पुरविले जात आहे. गरिबांना अन्नधान्य मिळणे याची काळजी मोदी सरकारने घेतली आहे. ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ या गोष्टींकडे मोदी सरकारने लक्ष दिले आहे. तसेच मोदी सरकारने
आमच्याकडे होऊ घातलेल्या सिह्स्थ कुंभमेळ्याकडे लक्ष दिले पाहिजे, यासाठी जास्त निधी दिला पाहिजे. पुणे-नाशिक रेल्वेचे काम लवकर झाले पाहिजे, अशी मागणी मी करत ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायची असून ४ जूननंतर मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : Loksabha Election 2024 : शरद पवारांचे नाशकात आगमन; संध्याकाळी भगरेंच्या प्रचारार्थ वणीत सभा

फडणवीस काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तुम्हाला भेटण्यासाठी गोदावरीच्या तीरावर आले आहेत. तुमच्यासाठी मोदींना नारपारचे पाणी आणण्याची विंनती केली आहे. त्यामुळे हे पाणी येथे आणल्याशिवाय राहणारा नाही. आपल्याकडे उपभोक्ता आणि शेतकऱ्यांमध्ये कांद्याचा वांदा होता. पंरतु, याबाबतही आम्ही विचार केला असून येत्या काळात कांद्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. आताच्या निवडणुकीत विरोधकांना उत्तर देतात येत नाही म्हणून विरोधकांकडून पाकिस्तानकडे मते मागण्याचे काम चालू आहे. राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यासाठी पाकिस्तानचे मंत्री मते मागतात. उद्धवजींच्या प्रचारसभेत पाकिस्तानचे झेडे दिसतात, असे फडणवीस यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या