Friday, September 20, 2024
Homeभविष्यवेधघरातील कोणत्या वस्तू रिकाम्या ठेऊ नये ?

घरातील कोणत्या वस्तू रिकाम्या ठेऊ नये ?

आपल्या जीवनात चढउतार सुरूच असतात. बर्‍याचदा आपल्या हातात काही पैसाच टिकत नाही असं होतं, याला काही वेळा वास्तूदोष जबाबदार असतात. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या रिकाम्या राहिल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आणि वास्तुदोषही होतो.

चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या गोष्टी…

जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. अनेकदा घरात अशा काही गोष्टी असतात, ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव दिसू लागतो. वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम होतो. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टीचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरीबीकडे वळतो. या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन अडचणी येऊ लागतात. म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी या गोष्टी घरात कधीही रिकाम्या ठेवू नयेत.

या पाच गोष्टी कोणत्या जाणून घेऊया…

  • धान्याचे भांडे रिकामे ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार घरात अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी भरा, जेणेकरून ते विकासात अडथळा बनू नये. पूर्ण अन्नधान्य जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते. यासोबतच अन्नपूर्णेची रोज पूजा करा, अन्नपूर्णा ही धन-धान्य ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची देवी आहे. त्यांची रोज पूजा केल्याने घरातील भांडार कधीच रिकामे राहत नाही.
  • बाथरूममध्ये रिकामी बादली – वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. असे केल्यास नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही बादली वापरत नसाल तर ती नेहमी पाण्याने भरा. यासोबतच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरा, बादली वापरताना ती पाण्याने भरून ठेवा, रिकामी ठेवू नका.
  • तिजोरी खाली ठेवू नका – तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नयेत. हे नेहमी लक्षात ठेवावे, थोडे पैसे नेहमी ठेवावेत. रिकाम्या तिजोरी किंवा पर्समुळे गरिबी येते. म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजेत हे लक्षात ठेवले पाहिजे. हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका. यासोबतच तिजोरीत गाई, गोमती चक्र, शंखही ठेवू शकता. त्यातून तुमच्या समृद्धीत आणखी भर पडते.
  • देवघरातील जलपात्र – बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी, घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर पाण्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाकावे. देवालाही तहान लागते असे मानले जाते. पाण्याने भरलेले भांडे देवघरात ठेवल्यास भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दुसरीकडे, रिकाम्या पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात, ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
  • अपशब्द वापरू नका – आपल्या संस्कृतीेमध्ये भाषेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच जीभेवर ताबा ठेवा म्हणजे कोणाचाही अपमान करू नका. घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका, ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. असे केल्याने लक्ष्मी देवीला राग येतो आणि ती आपला मार्ग बदलते. म्हणूनच घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करू नका. या गोष्टी सदैव ध्यानात ठेवाव्यात की कर्म, शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान होऊ नये.
- Advertisment -

ताज्या बातम्या