Tuesday, July 2, 2024
HomeनाशिकNashik News : २५ कोटींचे नाट्यगृह बंद अवस्थेत

Nashik News : २५ कोटींचे नाट्यगृह बंद अवस्थेत

पाच वर्षापूर्वीच उद्घाटन, मनपाच्या निर्णयाअभावी धूळखात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पंचवटी (Panchvati) हिरावाडी परिसरातील (Hirawadi Area) महापालिकेच्या सहा एकरच्या जागेत २५ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले नाट्यगृह (Theater) बंद पडलेले आहे. पुढील महिन्यात या कामाच्या शुभारंभाला पाच वर्षे पूर्ण होणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभी केलेली वस्तू अधिक काळ बंद राहिल्यास त्या वस्तू वापराभावी खराब होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

हे देखील वाचा : Nashik News : चार तालुक्यांत पावसाची दमदार हजेरी; १३ गावे, २१ वाड्यांचे टँकर बंद

पंचवटीकर अनेकदा कार्यक्रमासाठी नाट्यगृहाची मागणी करत असतात. मात्र अजून त्याबाबत काही निर्णय झालेला नाही. असे उत्तर मनपा प्रशासनाकडून (Municipal Administration) देण्यात येते.यापूर्वी उद्घाटनाची प्रतीक्षा होती. आता उद्घाटन झाले तरी नाट्यगृह कार्यक्रमासाठी तत्काळ खुले करण्यात येत नाही.

हे देखील वाचा : Nashik News : शहरातील पाणी पुरवठा होणार विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

याशिवाय पंचवटी परिसरातील दुसरे नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात आलेले आहे ते देखील अजून सुरु झालेले नाही. त्यामुळे पंचवटी परिसरातील दोन भव्य वस्तू बंद पडलेल्या स्थितीत आहे.ते तत्काळ सुरु करावे, जेणेकरून मनपाच्या उत्पन्नात भर पडेल. शिवाय सामाजिक संस्था, कलाकारांचा हिरमोड होणार नाही.

हे देखील वाचा : Nashik News : ‘त्या’ मारहाणीची सखोल चौकशी करा – जिल्हाधिकारी

असे आहे नाट्यगृह

१) सहा एकरच्या जागेत २९०० चौरस मीटरचे बांधकाम.
२) दोन्ही मजल्यावर स्वतंत्र दोन तालीम हॉल
३) भव्य रंगमंच, सुसज्ज असा मेकअप रूम प्रकाशयोजना,ध्वनिव्यवस्था, स्वयंचलित सरकते पडदे.
४) बाल्कनीत १५० आणि खाली ५०० अशा ६५० आरामदायी खुर्च्यांची आसनव्यवस्था.
५) प्रशस्त पार्किंगमध्ये ३४७ चारचाकी, ३४५ दुचाकी, १७४ सायकली पार्क करण्यासाठी प्रशस्त व्यवस्था.
६) महिला व पुरुषांसाठी नाट्यगृहाच्या दोन्ही बाजूला प्रसाधनगृह,व्हीआयपी रूम, रंगीत तालीम करण्यासाठी दोन हॉल.
७) अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा.लेटेस्ट टेक्नॉलॉजीची साउंड सिस्टिम, अत्याधुनिक स्टेज लाइट.
८) मुख्य रंगमंच १५ मीटर बाय १० मीटर.
९) संपूर्ण इमारतीला अग्निशमन यंत्रणा.

पंचवटी परिसरात २५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली वास्तू बंद पडलेली एवढी प्रशस्त आणि भव्य वास्तू बंद ठेवल्यामुळे महानगरपालिकेचे नुकसान होत आहे. शिवाय जास्त दिवस बंद राहिल्यास येथील वस्तू खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी यावर मनपा आयुक्तांनी लक्ष देऊन तात्काळ मार्ग काढावा.

विजय राऊत,अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभाग

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या