Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमहावितरणला वाली कोण?

महावितरणला वाली कोण?

पुनदखोरे । संदिप जगताप | Punadkhore

महावितरण (MSEDCL) विभागात रोज एक ना अनेक गैरप्रकार उघडकीस येत असुन होणार्‍या प्रकारांकडे न शासन लक्ष देत आहे न वरीष्ठ अधिकारी यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांची मुजोरी वाढतच असल्याने संबधित विभागाला कोणी वाली आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

- Advertisement -

कळवण वीज महावितरण विभागातंर्गत (Kalvan Electricity MSEDCL Divison) भेंडी ते पिंपळे दरम्यान 33 केव्ही लाईनमध्ये झालेले निकृष्ठ दर्जाचे काम असो, अधिकारी व कर्मचार्‍यांचां मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा असो, ग्रांहकांना पुर्व सुचना न देता विजपुरवठा खंडीत करण्याचा प्रकार असो, कार्यालयातील अधिकारी व कर्मचांर्‍यांकडून वीज ग्राहकांना दिलेली अपमानास्पद वागणुक असो, ठेकेदारांमध्ये कामे मिळविण्यासाठी आर्थिक तडजोड असो की, शासकीय मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार असो.

किंवा कनिष्ठ अभियंताकडून आदीवासी शेतकरी (farmer) बांधवांची रोहीत्र बसविण्यासाठी करण्यात आलेली आर्थिक पिळवणुक असे अनेक प्रकरणे कळवण महावितरण विभागातंर्गत होत असल्याने या प्रकरणांकडे न शासन लक्ष देते न वरिष्ठ अधिकारी यामुळे या मुजोर अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांची मनमानी दिवसेंदिवस वाढतच आहे.

महावितरणला कोणी वाली आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. मागील वर्षी भेंडी पारेषण मधुन पिंपळे येथे नविन सबस्टेशनसाठी 33 केव्ही लाईनच्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) होऊन सदर कामे ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केले होते. निकृष्ठ कामांना अनेक गांवानी विरोध दर्शविला होता. त्याचप्रमाणे विविध संघटनांनी निवेदने (memorandum) देऊन निषेध व्यक्त केला होता .

याबाबत अनेक वृतपंत्रामध्ये वृत प्रसारीत झाले होते. हे प्रकरण आर्थिक देवाणघेवाणीतून दाबले गेल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. अधिकारी व कर्मचांरी मुख्यालयी न राहता शासनास घरमालकांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून घरभाडे भत्ता हडपल्याचा प्रकार काय नवा नाही. यात या महाभांगानी चक्क शासनाची आर्थिक फसवणुक (Financial fraud) केली आहे .

या संदर्भातही वरीष्ट अधिकारी मुंग गिळून गप्प आहे. काही महीन्यांपुर्वी विज ग्राहकांना पुर्व सुचना न देता गोरगरीबांचा विजपुरवठा खंडीत (Power outage) करण्याचा धडाका लावला होता. यात महावितरणची हुकुमशाही होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी कार्यालयातील एका अधिकार्‍याने विजबिल कमी करणार्‍या विज ग्राहकांशी वाद घालत अरेरावी करीत अपमानास्पद वागणुक दिली होती.

संबधित अधिकार्‍याची साधी चौकशी सुध्दा महावितरणने केली नाही. त्याचप्रमाणे एका अधिकार्‍याने महावितरणच्या आवारातून शासकीय मालमत्तेची रात्रीच्या अंधारात सुरक्षा रक्षकाच्या मदतीने परस्पर विल्हेवाट लावुन आपले चारचाकी वाहन लावण्यासाठी शेड करून घेतले होते. या संदर्भात कार्यकारी अभियंता व कार्यकारी उपअंभियंता यांना विचारले असता त्यांनी तोंडावर बोट कानावर हात ठेवणे पंसद केले.

महावितरणचे अनेक कामे ठेकेदारांमार्फत होत असतात . यात सुद्धा मोठया प्रमाणात आर्थिक तडजोड होत असल्याची चर्चा आहे. महावितरणमध्ये ठेकेदार अधिकारी तर अधिकारी ठेकेदार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ठेकेदारांना कामे उपलब्ध करण्यासाठी मोठी चढाओढ करावी लागते . यात ठेकेदारांमध्ये अंतर्गत वाद सुद्धा होत असल्याचे समजले आहे.

असे अनेक प्रकार कळवण महावितरण विभागात घडत असतांना या विभागाकडे न शासनाचे लक्ष आहे न वरीष्ठ अधिकार्‍यांचे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्यामुळे महावितरणचा कारभार रामभरोसे असुन या विभागाला कोणी वाली आहे का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. तरी शासनाने कळवण महावितरणमध्ये होत असलेल्या गैरकारभाराची गोपनिय चौकशी करून संबधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या