Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमपत्नीचा खून करून 19 वर्षापासून पसार असलेला पती जेरबंद

पत्नीचा खून करून 19 वर्षापासून पसार असलेला पती जेरबंद

उच्च न्यायालयाने ठोठावली आहे जन्मठेप || स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पत्नीच्या खुनाच्या (Wife Murder) गुन्ह्यात जन्पठेपेची शिक्षा (Life Imprisonment) लागलेला परंतू गेल्या 19 वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला (Accused) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (LCB Police) वांबोरी (ता. राहुरी) येथील शासकीय विश्रामगृहातून ताब्यात घेत जेरबंद (Arrested) केले आहे. मच्छिंद्र शंकर कदम (रा. मांजरसुंबा, ता. नगर) असे त्याचे नाव आहे. त्याने पत्नी आशाबाई उर्फ बायजाबाई मच्छिंद्र कदम हिचा माहेरून 15 हजार रूपये रोख रक्कम आणावी म्हणून छळ करून मारहाण (Beating) केली होती. तसेच विष पाजुन जीवे ठार मारले होते.

- Advertisement -

या प्रकरणी बाळासाहेब हिंदेराव ससे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) 1995 साली त्याच्याविरूध्द खूनाचा (Murder) गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात त्याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 31 जुलै 1996 रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. सदर शिक्षेविरूध्द त्याने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात (Chhatrapati Sambhajinagar Bench) अपील दाखल केले होते. येथे सुनावणी होऊन 6 जुलै 2005 रोजी त्याची जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने कायम केली होती. तेव्हा पासुन तो फरार होता.

YouTube video player

सदर फरार आरोपीचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोहर शेजवळ, पोलीस अंमलदार शरद बुधवंत, सुरेश माळी, प्रमोद जाधव यांच्या पथकाने आरोपी कदम याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस (MIDC Police) करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार, कोणत्याही क्षणी...

0
मुंबई । Mumbai राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळाले आहेत. महानगरपालिकांचे निकाल...