Wednesday, September 11, 2024
Homeनाशिककिरकोळ भांडणातून पत्नीची हत्या

किरकोळ भांडणातून पत्नीची हत्या

निफाड । प्रतिनिधी | Niphad

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) जवळील शिरवाडे वणी (Shirwade Vani)येथे पती-पत्नीच्या वादातून पत्नीचा तिच्या माहेरीच पतीने खून (Murder) केल्याची घटना शिरवाडे वणी येथे घडली. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) एकलहरे (Eklhare) येथील जान्हवी नामदेव महाले (Janhvi Namdev Mahale) ही माहेरी शिरवाडे वणी येथे पती नामदेव उत्तम महाले यांच्यासोबत आलेली होती. त्यावेळी तिचा आणि पतीचा किरकोळ वाद झाला.

त्या वादाचे रूपांतर जोरदार भांडणात झाल्याने पती नामदेवने लाकडी दांड्याने पत्नी जान्हवी महाले हिच्या डोक्यात जोरात वार करून तिला गंभीररित्या जखमी केले. डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे पाहून पती घटनास्थळावरून फरार झाला.

तसेच या घटनेची माहिती मिळताच अशोक बाळू वाघ (५०) यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Baswant Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (PI Bhausaheb Patare) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे (Kunal Sapkale) करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या