Friday, May 3, 2024
Homeजळगावजळगाव बाजार समितीवर चेअरमनपदी लक्ष्मण पाटील यांची वर्णी लागणार?

जळगाव बाजार समितीवर चेअरमनपदी लक्ष्मण पाटील यांची वर्णी लागणार?

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (jalgaon Agricultural Produce Market Committee) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) प्रणित शेतकरी विकास पॅनलने (Farmer Development Panel) भाजप-शिंदे गटाच्या (BJP-Shinde faction) सहकार पॅनलचा (Cooperative Panel) दारुण पराभव करून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे जळगाव बाजार समितीवर सभापती (Chairman) म्हणून कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता लागून आहे. सभापती पदासाठी डॉ.सुनील महाजन, लक्ष्मण पाटील व श्यामकांत सोनवणे या तिघांची नावे चर्चेत असली तरी लक्ष्मण पाटील यांचे नाव आघाडीवर असून त्याच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता राजकीय गोटात चर्चिली जात आहे.

- Advertisement -

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

जळगाव कृषी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित संचालक डॉ.सुनील महाजन, लक्ष्मण पाटील आणि श्यामकांत सोनवणे यांनी महाविकास आघाडीची खंभीरपणे धुरा सांभाळली. या तिन्ही संचालकांमधूनच एका संचालकाला सभापतीपद दिले जाणार आहे. तसेच सभापतीपदासाठी या तिन्ही संचालकांच्या नावांची चर्चादेखील गुप्त बैठकीत झालेली असून आता सर्वांत प्रथम सभापतीपद कोणाला? मिळणार याविषयीचा निर्णय महाविकास आघाडीच्या सर्व संचालक घेणार असल्याची चर्चा आहे.

VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?जळगावात रक्ताचा तुटवडा

जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन निवडीच्या वेळेस महाविकास आघाडीचे स्पष्ट बहुमत असतानाही भाजप- शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांना बळ देऊन महाविकास आघाडीची सत्ता उलथवून लावली होती. आता देखील जळगाव बाजार समितीमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाकडे सध्या बहुमत नसले तरी भाजपच्या डावपेचांपासून महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेत सजग झालेली आहे.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणआरटीई प्रवेशासाठी आज अंतिम डेडलाईन

दि. 20 मे रोजी दुपारी 12 वाजता कृउबा समितीच्या सभागृहात सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग देखील आलेला आहे. सभापती-उपसभापती पदाच्या निवडीस वेगळे वळण मिळू नये, अशी धास्ती महाविकास आघाडीच्या संचालकांनी देखील घेतली असून संचालक सहलीवर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तरुणीची सव्वातीन लाखांत ऑनलाईन फसवणूक

सभापतीपदासाठी असा राहील फॉर्म्युला

महाविकास आघाडीचे डॉ.सुनील महाजन, लक्ष्मण पाटील, श्यामकांत सोनवणे या तिघांमध्येच सभापतीपद विभागून दिले जाणार आहे. त्यामुळे दीड-दीड वर्ष व शेवटचे सभापतिपद घेणार्‍याला 2 वर्षे किंवा 20-20 महिन्यांचा फॉर्म्युला देखील राहणार असल्याची चर्चा आहे. तसेच या तिन्ही संचालकांव्यतिरिक्त इतर संचालकांनाही सभापतिपद द्यायचे की नाही? याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीतच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुभाजकावर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या