Friday, May 3, 2024
Homeदेश विदेश...तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही - मेहबुबा मुफ्ती

…तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही – मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर –

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत,

- Advertisement -

जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही असं म्हटलं आहे. जोपर्यंत आम्हाला आमचा झेंडा परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणताच झेंडा फडकवणार नाही. आमचा झेंडाच तिरंग्याबरोबरच आमच्या संबंधांचा मुख्य दुवा होता, असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

चीनच्या मुद्द्यावरुनही मुफ्ती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चीनने आपली एक हजार स्वेअर किमीच्या भूभागावर ताबा मिळवला आहे हे खरं आहे. मला वाटतं आपण कसं तर 40 किमी भाग पुन्हा मिळवला आहे. चीन कलम 370 आणि जम्मू-काश्मीरबद्दलही भाष्य करताना दिसतो. काश्मीरला केंद्रशासित प्रदेश का बनवण्यात आलं आहे असं चीन विचारतो. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरवर आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढी चर्चा झाली होती ती यापूर्वी कधीही झाली नव्हती असंही मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

कलम 370 चा मुद्दा बिहार निवडणुकीमध्ये वापरला जात असल्याचा उल्लेख करतही मुफ्ती यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुफ्ती यांनी आपण आर्थिक स्तरावर बंगलादेशच्याही मागे पडलो आहोत. रोजगार असो किंवा इतर कोणताही मुद्दा असो प्रत्येक ठिकाणी सरकार अपयशी ठरलं आहे, असं म्हटलं आहे. सध्या सत्तेत असणार्‍या भाजपा सरकारकडे असं कोणतही काम नाहीय की ज्याच्या आधारे ते मतं मागू शकतील. आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेता येईल असं हे निवडणुकीच्या प्रचारात सांगत आहेत. त्यानंतर (करोना) लस मोफत देणार सांगत आहेत. आजही पंतप्रधान मोदींना मत मागण्यासाठी कलम 370 बद्दल बोलावं लागत आहे, असा टोला मुफ्ती यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या