Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedअवघ्या दाेन टक्के मद्यपींनाच आवडते वाईनची 'नशा'

अवघ्या दाेन टक्के मद्यपींनाच आवडते वाईनची ‘नशा’

औरंगाबाद – aurangabad

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने किराणा सामान मिळणाऱ्या (Supermarket) सुपर मार्केटसारख्या ठिकाणी वाईन (Wine) विकण्यास परवानगी दिल्यावर टीका होत असली तरी यामुळे फारशी चिंता करण्याची गरज वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे शहरात अन्य मद्यपेयांच्या तुलनेत वाईनचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण ३ टक्केच्या आत आहे. वाईनचे दरही तुलणेने अधिक आहेत. यामुळे या निर्णयाला अल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किराणा व्यापारीही दुकानात मद्यविक्रीस तयार नसल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

उद्धव सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला. यावरून महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केल्याची टीका भारतीय जनता पाटीकडून होत आहे. मात्र, मद्यविक्रीची आकडेवारी बघीतल्यास या निर्णयाचे फार परिणाम होण्याची शक्यता नाही.

वाईनला पसंती कमीच

राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या औरंगाबाद कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार चार प्रकारच्या मद्याची विक्री होते. यात देशी दारू, विदेशी दारू, बीअर आणि वाईनचा समावेश आहे. वाईनच्या तुलनेत अन्य सर्व प्रकारच्या मद्याची विक्री लाखो लिटरच्या घरात होते. गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यानच्या विक्रीवरून हे स्पष्ट होते. दरवर्षी असेच चित्र असते.

वाईन हजारात, अन्य लाखात

देशी दारू : १ कोटी ६ लाख २८ हजार ३३६ लिटर – ०.८७

विदेशी दारू (व्हिस्की, रम व अन्य) : ४२ लाख ३१ हजार ८४६ लिटर-२.२०

बीअर : ३० लाख ६५ हजार ३७८ लिटर- ३.०४

वाइन : ९३ हजार १९७ लिटर

जिल्ह्यातील मद्यविक्रीची ठिकाणे

बीअर शॉपी- १२१

वाईन शॉप- ३४

देशी दारू- १२९

परमीट रूम- ६५६

जीआर आल्यावर स्पष्टता

राज्य उत्पादन खात्यातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, अन्य मद्याच्या तुलनेत वाईन खूप कमी विकली जाते. सरकारच्या निर्णयाने ती वाढली तरी त्याचा जिल्ह्याच्या महसूलावर परिणाम होणार नाही. वाईनसह अन्य मद्याला कंपनीच्या गेटमधून बाहेर पडण्याआधीच उत्पादन शुल्क अदा करावे लागते. जिल्ह्यात प्राथमिक स्तरावरील केवळ एक वायनरी आहे. यामुळे महसूल वाढणार नाही. सरकारच्या निर्णयाची नेमकी कशी अंमलबजावणी करायची, हे जीआर आल्यावर स्पष्ट होईल.

हे प्रश्न अनुत्तरीत

-किराणा दुकानांना वाईनसाठी परवाना घ्यावा लागेल का?

-ड्राय-डेच्या दिवशी किराना दुकान बंद ठेवणार का?

-१८ वर्षाखालील ग्राहकांना वाईन विकणार का?

-विक्रीवर लक्ष कसे ठेवणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या