Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशयंदा कडाक्याची थंडी

यंदा कडाक्याची थंडी

नवी दिल्ली –

‘ला नीना’ च्या प्रभावामुळे यंदा कडाक्याची थंडी पडू शकते असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असून

- Advertisement -

सतर्कतेचा इशाराही दिला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांच्या म्हणण्यानुसार, यंदाचा हिवाळा हा याआधीच्या हिवाळ्यापेक्षा अधिक कडक असू शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे नीना कंडिशन… नीनामुळे थंडी कडाक्याची असेल. वातावरणातील बदलांमुळे केवळ तापमानात वाढ होते असं नाही तर त्यामुळे ऋतुंवरही परिणाम होतो.

मृत्युंजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात ऋतुंची दिशा ठरवण्यासाठी ला नीना आणि एल नीनो अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. ला नीनाच्या प्रभावामुळे आपल्याला यंदा कडाक्याच्या थंडीला सामोरं जावं लागू शकतं. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीफनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार यांसारख्या राज्यांत गारठ्यात कुडकुडून मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक दिसून येते. सावधानतेचा इशारा म्हणून हवामान विभागाकडून प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक चार्ट जाहीर केला जातो. यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हवामानाचा अंदाज आणि माहिती दिली जाते, असंही महापात्रा यांनी म्हटलंय.

‘ला नीना’ म्हणजे काय?

उल्लेखनीय म्हणजे, ला नीनाच्या प्रभावामुळे थंड हवेसाठी अनुकूल ठरते. परंतु, एल नीनो परिस्थिती मात्र प्रतिकूल असते. ला नीना ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे समुद्राचं पाणी थंड होण्यास प्रारंभ होतो. समुद्राचं पाणी अगोदरपासूनच थंड असतं, परंतु, ला नीनोमुळे पाण्यातला गारठा आणखीन वाढतो. अर्थातच त्याचा परिणाम वातावरणातील हवेवरही होतो. तर, एल नीनोची प्रक्रिया ला नीनोच्या अगदी विरुद्ध असते. या दोन्ही प्रक्रियेचा प्रभाव थेट भारताच्या मॉन्सून आणि हवामानावर दिसून येतोय.

- Advertisment -

ताज्या बातम्या