Friday, March 28, 2025
HomeमनोरंजनThe Kerala Story ची एक्सप्रेस सुसाट, अवघ्या नऊ दिवसांत कमावले १०० कोटी

The Kerala Story ची एक्सप्रेस सुसाट, अवघ्या नऊ दिवसांत कमावले १०० कोटी

मुंबई | Mumbai

चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल यांचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नऊ दिवस झाले. मात्र, चित्रपटावरून सुरू असलेला वाद अद्याप थांबलेला नाही.

- Advertisement -

चित्रपटावरुन सुरु असलेला वाद एका बाजूला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत असलेली कमाई एका बाजूला. चित्रपटाने नऊ दिवसात बजेटच्या दुप्पट कमाई केल्याचे समोर आले आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची आता पर्यंतची कमाई…

गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या सहा दिवसात ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. द केरळ स्टोरीची अवघ्या ९ दिवसात १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झालीय. निश्चितच या चित्रपटाच्या यशाचं श्रेय त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. केरळ स्टोरीला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे.

Akola Violence : अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक अन् जाळपोळ… एकाचा मृत्यू, कलम १४४ लागू

  • पहिला दिवस – 8.05 कोटी

  • दुसरा दिवस – 11.01 कोटी

  • तिसरा दिवस – 16.43 कोटी

  • चौथा दिवस – 10.03 कोटी

  • पाचवा दिवस – 11.07 कोटी

  • सहावा दिवस – 12.01 कोटी

  • सातवा दिवस – 12.54 कोटी

  • आठवा दिवस – 12.23 कोटी

  • नऊवा दिवस – 19.50 कोटी

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमासह या वर्षात शाहरुखच्या ‘पठाण’, रणबीरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ आणि सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमांनी 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

या शुक्रवारी बॉलिवूडचे इतर तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. विद्युत जामवालचा ‘IB 71’, बेल्लमकोंडा श्रीनिवासचा ‘छत्रपती’ आणि शर्मन जोशीचा ‘म्युझिक स्कूल’, अशा तीन सिनेमांनी मिळूनही ‘द केरला स्टोरी’चे काहीही नुकसान केले नाही. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाच्या वादळात नव्याने प्रदर्शित झालेल्या तिन्ही चित्रपटांची अवस्था दयनीय झाली आहे. हॉलिवूडचा ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी ३’ मात्र मोठ्या शहरात चालत असून, कोट्यवधींची कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...